Karwa Chauth 2020: बॉलिवूडमध्ये दिसली 'करवा चौथ'ची धूम; शिल्पा शेट्टी, सोनाली बेंद्रे, काजोल, बिपाशा बसू, रवीना टंडन अशा अभिनेत्रींनी केली पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा (See Photos and Videos)
जवळजवळ सर्व स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. यासह सोनाली बेंद्रे, बिपाशा बसू, काजल अग्रवाल, काजोल, ग्रेसी सिंह, काम्या पंजाबी अशा सेलेब्जनी हा सण साजरा केला
आज देशभरात करवा चौथचा (Karwa Chauth 2020) सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या खास प्रसंगी पत्नी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करते. रात्री पतीच्या हाताने पाणी पिऊन हा उपवास सोडला जातो. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही आपल्या पतींच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचा उपवास पाळला होता. करवा चौथच्या या खास निमित्ताने रवीना टंडन, नीलम कोठारी सारख्या बॉलिवूड स्टार्स दरवर्षीप्रमाणे अनिल कपूरच्या बंगल्यात पूजासाठी जमल्या होत्या. शिल्पा शेट्टीही (Shilpa Shetty) अनिल कपूरच्या घरी करवा चौथच्या पूजेसाठी आली होती. दरवर्षी अभिनेता अनिल कपूरची पत्नी सुनीता करवा चौथची पूजा आपल्या घरी आयोजित करते.
यंदाही सुनीताने आपल्या घरी ही पूजा आयोजित केली होती. या पूजेसाठी अनेक बॉलिवूड सेलेब्जनी हजेरी लावली होती. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे, शिल्पाचा करवा चौथवरील लूक व्हायरल होत आहे. यावेळी शिल्पा शेट्टीने लाल रंगाची साडी परिधान केली होती. करवा चौथसाठी सिंदूर, दागिने, चुडा, मंगळसूत्र असा तिचा पारंपारिक लुक खूपच सुंदर दिसत आहे. संजय कपूरची पत्नी महेप कपूरही पूजेची थाळी घेऊन अनिल कपूरच्या घरी पोहोचली. (हेही वाचा: शाहरुख खान प्रमाणे वाढदिवसानिमित्त बुर्ज खलीफा वर स्वत:चे नाव पाहण्याची इच्छा आहे? मोजावी लागेल 'इतकी' किंमत)
View this post on Instagram
#princenarula #yuvikachaudhary for #karvachauth ❤ #paptalk
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
View this post on Instagram
#bipashabasu and #KaranSinghGrover for #karvachauth ❤
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
View this post on Instagram
#arjunbijalani with wifey for #karvachauth ❤
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
View this post on Instagram
#SureshRaina with wifey #priyankachaudharyraina celebrate #karvachauth ❤
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
View this post on Instagram
Happy karwachauth ❤️ Saree @vastranti ❤️ Style by my @anusoru
A post shared by Kamya Shalabh Dang (@panjabikamya) on
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, सर्व स्त्रिया एकत्र बसून करवा चौथची पूजा करत आहेत. जवळजवळ सर्व स्त्रियांनी लाल रंगाचे कपडे परिधान केले आहेत. यासह सोनाली बेंद्रे, बिपाशा बसू, काजल अग्रवाल, काजोल, ग्रेसी सिंह, काम्या पंजाबी अशा सेलेब्जनी हा सण साजरा केला. टीव्ही कलाकारांमध्येही या उत्सवाची धूम पाहायला मिळाली. यंदा काजल अग्रवाल, नेहा कक्कर, मिहिका बजाज, प्राची तेहलान अशा काही अभिनेत्री आपला पहिला करवा चौथ साजरा करत आहेत.