Bhool Bhulaiyaa 3 On OTT: कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 3' लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार; चित्रपट कधी आणि कुठे पहायचा? जाणून घ्या

'भूल भुलैया 3' हा चित्रपट दिवाळीला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. कार्तिकच्या चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला. आता चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. आता चाहते हा चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत आहे.

Bhool Bhulaiyaa 3 (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Bhool Bhulaiyaa 3 On OTT: बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) चा 'भूल भुलैया 3' (Bhool Bhulaiyaa 3) हा चित्रपट दिवाळीला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. कार्तिकच्या चाहत्यांना हा चित्रपट खूप आवडला. आता चित्रपट प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. आता चाहते हा चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत आहे. कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भूल भुलैया 3' 19 व्या दिवशी 200 कोटी क्लबमध्ये सामील झाला आहे. 150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या, अनीस बज्मी दिग्दर्शित चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 388.9 कोटी रुपयांची कमाई केली.

भूल भुलैया 3 ओटीटी रिलीजची तारीख -

मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवला तर, भूल भुलैया 3 याआधी डिसेंबरमध्येच OTT वर येणार होता. आता या चित्रपटाच्या ओटीटीवर प्रदर्शित होण्याची तारीख बदलली आहे. हा चित्रपट आता जानेवारीत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होऊ शकतो. दुसरीकडे, कार्तिक आर्यनने या यशाचा आनंद इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 'रूह बाबा तोमर सदैव!! हे 11/11 आहे आणि स्वप्ने सत्यात उतरली आहेत, माझ्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक.. तुमच्या प्रेमाने मला येथे आणले आहे. या वाढदिवसाच्या भेटीसाठी धन्यवाद,' असं कॅप्शन कार्तिकने आपल्या पोस्टला दिलं आहे. (हेही वाचा -Bhool Bhulaiyaa 3 Box Office Collection Day 4: कार्तिक आर्यन-तृप्ती डिमरी स्टारर 'भूल भुलैया 3'चा बॉक्स ऑफिसवर दबदबा; भारतात 129.4 कोटींची कमाई)

कार्तिक आर्यन व्यतिरिक्त, चित्रपटाच्या तिसऱ्या भागामध्ये तृप्ती डिमरी, राजपाल यादव, विद्या बालन आणि माधुरी दीक्षितची प्रमुख भूमिका आहे. संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्यानंतरही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होऊ शकला. (हेही वाचा - Kartik Aaryan ने वाराणसीत गंगा आरतीला लावली हजेरी, अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडिओ केला शेअर)

भूल भुलैया 3 नंतर कार्तिक विशाल भारद्वाजच्या पुढच्या चित्रपटात दिसणार आहे. तसेच तृप्ती एकाच वेळी अनेक चित्रपटांचे शूटिंग करत आहे. धडक 2 मध्ये ती सिध्दांत चतुर्वेदी सोबत दिसणार आहे. याशिवाय, तृप्ती शाहिद कपूर सोबत अनटाइटल्ड चित्रपटाची तयारी करत आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now