Kareena Kapoor Khan New Home: करीना कपूर ने शेअर केला आपल्या नव्या घराचा फोटो; 'असं' आहे अभिनेत्रीचं ड्रीम हाउस

जुन्या सर्व व्यवस्थांबरोबरचं या नव्या घरामध्ये नव्या आवश्यक वस्तू जोडल्या गेल्या आहेत.

Kareena Kapoor Khan (PC - Instagram)

Kareena Kapoor Khan New Home: दुसऱ्यांदा आई होण्यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आजकाल आपल्या नवीन घरामुळे चर्चेत आहे. तिच्या नवीन घराबद्दल बर्‍याच दिवसांपासून चर्चा आहे. आता, अभिनेत्रीने तिच्या नवीन घरातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून करीना आपल्या नवीन घरात शिफ्ट झाल्याची पुष्टी झाली आहे. करीना कपूर खान सोशल मीडियावर खूपचं अ‍ॅक्टिव असते. करीना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून नवीन घराचे छायाचित्र शेअर केले आहे. या फोटोमध्ये करीनाच्या घरातील एका खोलीतील बेड, डार्क हार्डवुड फ्लोर, ग्रिड पॅनलिंगसह काचेचे दरवाजा आणि टेरेस परिसर दिसत आहे. हा फोटो शेअर करताना करीना कपूरने एक खास कॅप्शनही दिले आहे.

अभिनेत्रीने फोटो कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'नवीन सुरुवात करण्यासाठी दरवाजा'. करीना कपूर खानच्या नवीन घराचे चित्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अभिनेत्रीचे अनेक चाहते आणि सर्व सोशल मीडिया वापरकर्त्यांना तिच्या घराचा फोटो खूपचं आवडला आहे. यातील अनेक चाहत्यांनी करीनाचे नवीन घरासाठी अभिनंदन केंलं आहे. यापूर्वी सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या नवीन घराचे इंटिरियर डिझायनिंग दर्शनी शाह यांनी टाइम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वेबसाइटवर बोलताना उघड हे स्टार जोडपे लवकरचं त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होणार असल्याचं सांगितलं होतं. (वाचा - Rishi Kapoor यांच्या निधनानंतर अर्धवट राहिलेला 'शर्माजी नमकीन' चित्रपट परेश रावल करणार पूर्ण; 'या' तारखेला होणार रिलीज)

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by KK (@therealkarismakapoor)

दर्शनी शाह यांनी सांगितले होतं की, सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या नवीन घराचे नाव 'सतगुरु शरण' आहे. जुन्या सर्व व्यवस्थांबरोबरचं या नव्या घरामध्ये नव्या आवश्यक वस्तू जोडल्या गेल्या आहेत. घराचे संपूर्ण नूतनीकरण खासकरुन मुलाच्या जन्मासाठी केले गेले आहे. याशिवाय नवीन घरात करीनाचा मुलगा तैमूर अलीसाठी स्वतंत्र कक्षही आहे. या घरात बाळासाठी नर्सरी असेल. जुन्या घरापेक्षा हे खूप मोठे असेल. या घरात भव्य जिना, जलतरण तलाव, मैदानी क्षेत्र आणि मोकळ्या जागेसह हे घर खूपचं शानदार असणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif