तैमूर अली खान च्या वाढदिवसानिमित्त करीना कपूर ने केली नव्या प्रेग्नेंसी बुक ची घोषणा; Pregnancy Bible लवकरच होणार लॉन्च
Pregnancy Bible असे या पुस्तकाचे नाव असून पुढील वर्षी हे पुस्तक पब्लिश होणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिने आपल्या नव्या प्रेग्नेंसी बुकची घोषणा केली आहे. Pregnancy Bible असे या पुस्तकाचे नाव असून पुढील वर्षी हे पुस्तक पब्लिश होणार आहे. करीनाने मुलगा तैमूर अली खान याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आपल्या नव्या पुस्तकाची घोषणा केली आहे. Pregnancy Bible हे करीनाचे पहिलेवहिले पुस्तक असून यात गरोदरपणाबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे नव्याने आई होणाऱ्या प्रत्येकीसाठी हे पुस्तक अगदी खास ठरणार आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत करीनाने आपल्या नव्या पुस्तकाबद्दल ची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.
करीनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, "माझ्या पुस्तकाची Pregnancy Bible for All Moms-to-Be ची घोषणा करण्यासाठी आजचा दिवस एकदम परफेक्ट आहे. यात मी सर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे. अगदी मॉर्निंग सिकनेस, डाएट ते फिटनेस. तुम्ही हे पुस्तक कधी वाचाल, असे मला झाले आहे. हे पुस्तक Juggernaut Books कडून 2021 मध्ये पब्लिश करण्यात येईल." (Taimur Ali Khan Birthday: करीना कपूर हिने तैमुरच्या फोटोंचा व्हिडिओ शेअर करुन आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, Watch Video)
करीना कपूर खान पोस्ट:
करीना कपूर दुसऱ्यांदा प्रेग्नेंट असून ती नियमितपणे बेबी बंप सह आपले फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असते. 12 ऑगस्ट रोजी करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी प्रेग्नेंसीची घोषणा केली. दरम्यान, करीना कपूर खान हिने नुकतेच तिच्या आगामी सिनेमा 'लाल सिंह चड्ढा' चे दिल्ली येथे सुरु असलेले शूटिंग पूर्ण केले. या सिनेमात करीना सोबत आमिर खान प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.