प्रेग्नंट कल्की कोचीन ला पाहून करीना ला झाली आपल्या गरोदरपणाची आठवण, दिली अशी मिश्किल प्रतिक्रिया

या चॅट शो दरम्यानची बातचीत अद्याप समोर आलेली नाही. पण दोघींमधलं एक अनौपचारिक बोलणं समोर आलं आहे, ज्यात करिनाने कल्की ला बघून आपल्या गरोदरपणातली एक मजेशीर गोष्ट सांगितली.

Kalki Koechlin And Kareena Kapoor (Photo Credits: Instagram)

सध्या कल्की कोचीन (Kalki Koechlin) हिची प्रेग्नंसी बॉलिवूड वर्तुळात चांगलीच रंगलीय. बॉलिवूडकरांसोबत तिच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अलीकडेच तिने आपल्या गरोदरपणाची बातमी शेअर केली होती. तसेच होणा-या बाळाला मला पाण्यात जन्म द्यायचा आहे अशी इच्छाही तिने व्यक्त केली होती. Guy Hershberg या तिच्या बॉयफ्रेंडपासून ती गरोदर आहे. अलीकडेच ती करिना कपूरच्या (Kareena Kapoor) चॅट शोमध्ये पाहुणी म्हणून गेली होती. या चॅट शो दरम्यानची बातचीत अद्याप समोर आलेली नाही. पण दोघींमधलं एक अनौपचारिक बोलणं समोर आलं आहे, ज्यात करिनाने कल्की ला बघून आपल्या गरोदरपणातली एक मजेशीर गोष्ट सांगितली.

या किस्सा ऐकून कल्की आणि करीना दोघीही खळखळून हसू लागल्या, पाहूया काय म्हणाली करीना कपूर....

 

View this post on Instagram

 

#kareenakapoorkhan poses with pregnant #kalkikoechlin today for her chat show #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

या व्हिडिओत कल्कीला पाहून करीना म्हणाली की , "मी जेव्हा सहा महिन्यांची गर्भवती होती तेव्हा मी एखाद्या गायीसारखी दिसत होती." तिचे हे बोलणे ऐकून दोघीही मनमुराद हसू लागल्या.

हेदेखील वाचा- लग्नापूर्वीच अभिनेत्री कल्की कोचलिन होणार आई, नवजात बाळासंदर्भात केला नवा खुलासा

कल्कि हिच्या ब्रॉयफ्रेंडचे नाव Guy Hershberg असून तो पेशाने क्लासिकल पियॉनिस्ट आहे. हर्शबर्ग सध्या मुंबईत राहत आहे. सुत्रांच्या मते हर्शबर्ग जनावरांसाठी काम करणाऱ्या एका एनजीओ संबंधित जोडला गेला आहे. गेल्या महिन्यातच कल्कि हिने हर्शबर्ग याच्यासोबत एक फोटो शेअर केला असून दोघे समुद्राच्या येथे मजामस्ती करताना दिसून येत आहेत.

कल्कि हिचे नाते हर्शबर्ग याच्यासोबत सुरु होण्यापूर्वी 2011 मध्ये तिने चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यासोबत लग्न केले होते. या दोघांनी एकमेकांना दोन वर्ष डेट केल्यानंतर विवाहबंधनात अडकले होते. मात्र अनुराग आणि कल्कि या दोघांचे लग्न बराच काळ टिकू न शकल्याने ते विभक्त झाले. आता कल्कि आणि अनुराग फक्त एकमेकांचे मित्रमैत्रीण असल्याचे सांगत आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif