Kareena Kapoor ने कोविड योद्धाना Anti-Microbial T-shirts देत व्यक्त केला त्यांच्या परिश्रमांबद्दल आदर!

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor खान हीने सध्या कोरोना संकटकाळामध्ये रूग्णसेवा देणार्‍यांसाठी खास अ‍ॅन्टी मायक्रोबायल टीशर्ट्स (Anti-Microbial T-shirts) गिफ्ट दिले आहेत.

Kareena Kapoor (file photo)

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर (Kareena Kapoor खान हीने सध्या कोरोना संकटकाळामध्ये रूग्णसेवा देणार्‍यांसाठी खास अ‍ॅन्टी मायक्रोबायल टीशर्ट्स (Anti-Microbial T-shirts) गिफ्ट दिले आहेत. दरम्यान पीपीई किट तासन तास घालून रूग्णसेवा देणं हे मोठं जिकरीचं काम आहे. मात्र मागील सहा महिन्यांपासून देशभर डॉक्टर, नर्स आणि इतर आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी अशाप्रकारे सेवा देत आहेत. त्यांचा भार थोडा हलका करण्यासाठी आता अ‍ॅन्टी मायक्रोबायल शर्ट्स  मदत करतील. या कापडाच्या प्रकारामध्ये संसर्गाची वाढ होण्याचा धोका कमी होतो. सोबतच घामाच्या दुर्गंधीचा त्रास होत नाही.

करिना कपूरने या अ‍ॅन्टी मायक्रोबायल टी शर्ट्सचं वाटप मुंबईमध्ये सायन रूग्णालय, दिल्लीच्या एम्स रूग्णालय आणि बंगळूरूच्या साक्रा वर्ल्ड हॉस्पिटलमध्ये केले आहे. यामुळे तेथील आरोग्य कर्मचार्‍यांना पीपीई कीट मध्ये काम करणं सुसह्य होणार आहे. दरम्यान सोशल मीडीयावर त्याबाबतची एक पोस्ट देखील करिना कपूरने शेअर केली आहे.

करिना कपूर खान पोस्ट

 

View this post on Instagram

 

Heartfelt gratitude to all the healthcare workers risking their lives every day to save people in need. Thank you for showing us that we are and will always be #StrongerTogether 🙏🏻

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan) on

करिनाने या पोस्ट मध्ये कोविड योद्धाच्या कामाप्रती आदर व्यक्त करत त्यांना धन्यवाद म्हटले आहे. तुमच्या कामासाठी धन्यवाद हा शब्द अपुरा आहे. तुम्ही फार मोठं काम करत आहात. असं म्हणत तिने एकोपा जपला आहे.

दरम्यान करिना कपूर लवकरच दुसर्‍यांदा आई होणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिने ही गोड बातमी शेअर केली आहे. कोरोना संकटामध्येही करिना काम करत आहे. पुरेशी खबरदारी घेत तिने हळूहळू कामाला सुरूवात केली आहे. अमिर खान सोबत लाल चड्डा सिंह आणि करण जोहरच्या तख्त मध्ये करिना झळकणार आहे.