Kareena Kapoor ची Instagram वर वर्षपूर्ती; खास व्हिडिओद्वारे शेअर केला प्रवास (Watch Here)

इंस्टाग्रामवर आपल्या फोटोज, व्हिडिओजने चाहत्यांना खिळवून ठेवणाऱ्या करीनाने आज एक खास व्हिडिओ इंस्टावर शेअर केला आहे.

Kareena Kapoor (File Photo)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिने आज इंस्टाग्रामवर (Instagram) एक खास व्हिडिओ (Video) शेअर केला आहे. इंस्टाग्रामवर आपल्या फोटोज, व्हिडिओजने चाहत्यांना खिळवून ठेवणाऱ्या करीनाने आज एक खास व्हिडिओ इंस्टावर शेअर केला आहे. याचे कारणही खास आहे. आज 6 मार्च रोजी करीनाने इंस्टाग्रामवर पर्दापण करुन एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यानिमित्ताने करीनाने 365 दिवसांचा प्रवास एका खास व्हिडिओद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

हा व्हिडिओ शेअर करत करीनाने लिहिले की, "मजा करण्यासाठी आपण हा प्रवास सुरु ठेऊया." या व्हिडिओमध्ये वर्षभरातील खास क्षणांची झलक पाहायला मिळत आहे. व्हिडिओच्या शेवटीने तिने चाहत्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभारही मानले आहेत. तसंच तुमच्या सोबत अजून काही शेअर करण्यासाठी मी उत्सुक असल्याचेही तिने म्हटले आहे. (Kareena Kapoor Khan च्या नव्या चिमुकल्याची पहिली झलक आली समोर; तैमुर, सैफ सह हॉस्पिटल मधून घरी परतली, Watch Video)

Kareena Kapoor Post:

 

View this post on Instagram

 

A post shared by Kareena Kapoor Khan (@kareenakapoorkhan)

दरम्यान, अलिकडेच करीनाने पुन्हा एकदा आई झाली आहे. 21 फेब्रुवारी रोजी करीनाने दुसऱ्या बाळाला जन्म दिला. तैमूर अली खान नंतर करीनाला परत पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. सध्या दुसऱ्या बाळाची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असून बाळाच्या नावाची चर्चाही सोशल मीडियावर रंगत आहे. 20 डिसेंबर 2016 मध्ये तैमुर अली खानच्या जन्मानंतर 4 वर्षांनी करीनाच्या घरात पुन्हा चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे. बाळाच्या आगमनाची जय्यत तयारी बेबोने केली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif