Kareena Kapoor Birthday: करीना कपूर चा आज 40 वा वाढदिवस, परिवारासोबत जोरदार सेलिब्रेशन (See Photos)

करीना कपुर (Kareena Kapoor) ही आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. या क्षणी करीना ने सैफ अली खान (Saif Ali Khan), करीश्मा कपुर (Karishma Kapoor) व स्वतःच्या पालकांंसोबत जोरदार सेलिब्रेशन केले.

Kareena Kapoor Birthday (Photo Credits: Instagram)

Happy Birthday Kareena Kapoor: कभी खुशी कभी गम (K3G )  मधील पू (Pooh) , जब वी मेट (Jab We Met) मधील गीत (Geet)  म्हणजेच अर्थात करीना कपुर (Kareena Kapoor) ही आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. या क्षणी करीना ने सैफ अली खान (Saif Ali Khan), करीश्मा कपुर (Karishma Kapoor) व स्वतःच्या पालकांंसोबत जोरदार सेलिब्रेशन केले. काल रात्री केक कटींंग करतानाचे करीनाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये करीना नेहमीप्रमाणे Glowing and Radiant दिसतेय. सध्या लॉकडाउन असल्याने हे सेलिब्रेशन अगदी घरगुतीच करण्यात आले मात्र त्यातही या दोन्ही परिवारांंच्या सहवासात करीना खरोखरच खुश असल्याचं दिसुन येतंंय.

तुम्ही पाहु शकता करीश्मा कपुर ने बर्थडे गर्ल करीना चा केक सोबतचा फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत तर दुसर्‍या फोटो मध्ये करीनाचे वडील रणधीर कपुर, आई बबिता, सैफ अली खान अशी सगळी गॅंग दिसुन येतेय, लग्न आणि मुल झाल्यापासुन करीना अधिक वेळ आपल्या परिवारासोबत घालवत असते त्यामुळे आपल्या खास दिवशी सुद्धा तिने परिवारासोबतच सेलिब्रेशन केले आहे. दुसरीकडे करीना, मलायका अरोरा ही बॉलिवूडची गर्ल्स गॅंग सुद्धा बरीच फेमस आहे मात्र कोरोनामुळे या मैत्रिंणीसोबत करीना ऑनलाईन सेलिब्रेशन करु शकते.

करीना कपुर Birthday Celebration Photos

 

View this post on Instagram

 

Birthday girl ❤️❤️❤️ we love you #happybirthday

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

करीना कपुर चा जन्म 1980 मध्ये मुंंबईतच झाला होता, कपुर कुटुंब हे बॉलिवूड मध्ये महत्वाचं मानलं जात असल्याने तिचाही ओढा लहानपणापासुन अभिनय आणि सिनेमांंमध्येच होता. आपल्या उत्तम करीअर नंंतर करीनाने सैफ अली खान शी लग्न करुन आपल्या कुटुंबाची सुरुवात केली होती. तैमुर च्या जन्मानंंतर मॉमी करीना सुद्धा आपली भुमिका उत्तम बजावतेय आणि आता तर या कुटुंबात आणखीन एक नवीन सदस्य जोडला जाणार आहे. कामाच्या बाबत सांगायचंं तर करीना आमिर खान सोबत लवकरच लाल सिंंह चड्ढा मध्ये दिसुन येणार आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now