करिना कपूर- सैफ अली खान यांच्या प्रेम प्रकरणाबाबत प्रथम 'या' कलाकाराला कळले होते

कारण सैफसोबत प्रेमसंबंधात अडकण्यापूर्वी शाहिद कपूर याच्यासोबत नाव जोडले गेले होते.

करिना कपूर आणि सैफ अली खान (Photo Credits-Instagram)

बॉलिवूडमध्ये बबो म्हणून ओळखली जाणारी करिना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली (Saif Ali Khan) खान यांच्या रिलेशनशिपबाबत बी- टाऊनमध्ये फार चर्चा रंगल्या होत्या. कारण सैफसोबत प्रेमसंबंधात अडकण्यापूर्वी शाहिद कपूर याच्यासोबत नाव जोडले गेले होते. मात्र काही कारणामुळे या दोघांचे नाते अधिक काळ टिकले नाही. परंतु त्यानंतर करिना हिचे नाव सैफ अली खान सोबत जोडल्यागेल्यानंतर बॉलिवूडमधील खिलाडी याला तिच्या नात्याबाबत कळले होते.

तर अभिनेता अक्षय कुमार याला सर्वात आधी करिना आणि सैफ यांच्या प्रेमसंबंधाबाबत कळले होते. अक्षय आणि सैफ अली खान एकमेकांना गेल्या 25 वर्षांपासून चांगल्या प्रकारे ओळखत असून या दोघांची मैत्री खिलाडी तू अनाडी पासून सुरु झाली होती. सध्या या दोघांची मुले आरव आणि इब्राहिम एकमेकांचे चांगले मित्र आहेत. अक्षय आता पर्यंत जसे सैफ सोबत काम करुन भुमिकेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच करिना सोबत काम करताना अक्षयने आपली वागणूक तिच्या प्रति ठेवली. तर करिना आणि अक्षय यांचा आगामी चित्रपट गुड न्युजच्या प्रमोशन दरम्यान सैफ सोबतच्या नात्याचा खुलासा करण्यात आला. त्यावेळी करिना हिने अक्षय याला आधी सैफ आणि माझ्या नात्याबद्दल कळले असल्याचे स्पष्ट केले आहे.(मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान केवळ एका जाहिरातींसाठी घेतो एवढी रक्कम! आकडा ऐकून व्हाल थक्क)

 

View this post on Instagram

 

Hai sauda khara khara 💃🏼🕺🏽❤️❤️ @akshaykumar

A post shared by Kareena Kapoor Khan (@therealkareenakapoor) on

चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान सैफ आणि करिना या दोघांची खोली अक्षयच्या खोलीच्या जवळच असल्याने त्याला या दोघांबाबत कळले असल्याचे बोलले जाते. तर अक्षयने करिना, सैफ सोबत टशन चित्रपटाचे काम करताना या दोघांच्या नात्याचा अधिक खुलासा होत असल्याचे दिसून आले होते. एवढेच नाही तर सैफ याने टशन चित्रपटात करिना हिच्या नावाचा टॅटू काढल्याचे दिसून आले होते.