करण जौहर ने पांढ-या झालेल्या केसांमधला फोटो शेअर करुन म्हणाला 'मला वडिलांचा रोल द्या', यावर एकता कपूर दिली 'ही' तगडी ऑफर
मात्र तरीही मी एखाद्या संधीची अपेक्षा करत आहे. त्यामुळे सर्व दिग्दर्शक, निर्मात्यांसाठी मी एक घोषणा करत आहे, मला वडिलांचा रोल देऊ शकता' असे लिहिले आहे.
लॉकडाऊन काळात सर्व बॉलिवूड काही ना काही स्वत:ला सक्रिय ठेवण्यासाठी सोशल मिडियावर आपले काही ना काही व्हिडिओज, फोटोज शेअर करत आहे. ज्याने त्यांच्या चाहत्यांना ते लॉकडाऊनमध्ये काय करतायत याची देखील माहिती मिळत आहे. कुणी रेसिपीज बनवत आहे, कुणी हेअर कट, कुणी घरची साफसफाई तर कुणी पेटिंग करताना दिसत आहे. करण जौहरने (Karan Johar) यापेक्षा थोडी वेगळी शक्कल लढवत आपला पांढ-या झालेल्या केसांचा फोटो शेअर केला आहे. शिवाय या फोटो खाली 'कुणी मला वडिलांचा रोल द्याल का असे म्हटले आहे. यावर अनेक बॉलिवूडकलाकारांनी त्याला रिप्लाय दिला आहे. मात्र सर्वात भन्नाट कमेंट दिग्दर्शक एकता कपूर ने दिली आहे.
करण जौहरने या फोटो खाली 'मला माहित आहे माझा अभिनय हा कोरोना व्हायरस पेक्षाही जास्त भयानक आहे. मात्र तरीही मी एखाद्या संधीची अपेक्षा करत आहे. त्यामुळे सर्व दिग्दर्शक, निर्मात्यांसाठी मी एक घोषणा करत आहे, मला वडिलांचा रोल देऊ शकता' असे लिहिले आहे.
बॉलिवूडचा रॅपर बादशाह ने Lockdown काळात केले टक्कल आणि बनवले 'हे' मजेशीर TikTok Video
यावर एकता कपूर हिने मजेशीर कमेंट करत एक तगडी ऑफर दिली आहे. ज्यात तिने म्हटले आहे की, 'माझ्याकडे एक डेली सोप आहे.ऋषभ बजाज चे पात्र तू चांगले करु शकतोस. यातील त्याचे पांढरे केस खूप हॉट दिसतात. त्यामुळे तू टिव्हीवर ये. येथे लोकांचे मनोरंजन करणे सोपे असते', असे सांगितले आहे. दिग्दर्शक एकता कपूर सह अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्याच्या या फोटोवर कमेंट केले आहे.
येथे सांगू इच्छितो की, करण जोहरने पीएम केअर्स फंडात (PM Cares Fund) आपले योगदान दिले होते. आता करण जोहरने धर्मा प्रॉडक्शन (Dharma Production) सह एकत्रितपणे कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी एनजीओ ची साथ दिली आहे.