Kanye West Controversy Over Jesus: अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट याच्याकडून स्वत:ची तुलना देवासोबत, 'येशूबद्दल समस्या' असल्याचेही वक्तव्य

मुलाखतीदरम्यान त्याने स्वतःची देवाशी तुलना केली आणि 'येशूबद्दल अनेक समस्या' असल्याचे म्हटले. व्यक्त केल्या. रेडिओ होस्ट बिग बॉय याने टाय डोला साइनसह त्याच्या "व्हल्चर्स 1" अल्बमवर चर्चा करताना केलेल्या संभाषणादरम्यान केलेल्या टीकेमुळे हा वाद निर्माण झाला.

Kanye West | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Kanye West Comments on Jesus: अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट (Kanye West Controversy) याने एका मुलाखतीदरम्यान केलेल्या टिप्पण्यांनंतर वाद निर्माण झाला आहे. मुलाखतीदरम्यान त्याने स्वतःची देवाशी तुलना केली आणि 'येशूबद्दल अनेक समस्या' असल्याचे म्हटले. व्यक्त केल्या. रेडिओ होस्ट बिग बॉय याने टाय डोला साइनसह त्याच्या "व्हल्चर्स 1" अल्बमवर चर्चा करताना केलेल्या संभाषणादरम्यान केलेल्या टीकेमुळे हा वाद निर्माण झाला. रॅपरने केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे जोरदार पडसाद उमटले. सोशल मीडियावरही अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत रॅपरने वक्तव्याबाबत तातडीने खुलासार करावा, अशी मागणी केली.

कान्ये वेस्ट याच्या वक्तव्याबद्दल इंडिपेंडंटने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, ये या टोपननावाने ओळखला जाणारा अमेरिकन रॅपर रेडिओ होस्ट बिग बॉय सोबत टाय डोला साइन यांच्या "व्हल्चर्स 1" अल्बमवर चर्चा चर्चा करत होता. या वेळी विविध मुद्द्यांवरुन चर्चा सुरु असताना ती धर्मावर आली. या वेळी त्याने स्वत:ची तुलना देवासोबत केली तसेच आपणास येशू ख्रिस्तासोबत अनेक समस्या असल्याचेही विधान केले. आपल्या विधानावर सवीस्तर प्रतिक्रिया देताना रॅपरने म्हटले की, "मी प्रार्थना केली आणि मला येशू दिसला नाही. मी अशा अनेक गोष्टींमधून गेलो आहे. जेथे मी येशूला शोधण्याचा प्रयत्न केला पणतो मला आढळला नाही." आपल्या एकूण मुलाखतीदरम्यान त्याने त्याचे कुटुंब, करिअर आणि वैयक्तिक संघर्षांसह जीवनातील आव्हानांना सामोरे जाताना केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. (हेही वाचा, अमेरिकी अभिनेत्री Julia Fox हिने टीव्ही कार्यक्रमात एक्स बॉयफ्रेंड Kanye West याच्या लिंगाबाबत केला खुलासा)

जीवनातील विविध प्रश्नांना भीडताना केवळ प्रार्थनेवर विसंबून राहण्याच्या पारंपरिक कल्पनेवर टीका करत त्याने म्हटले की, खरे तर ही बाब मला फारशी पसंत पडत नाही. आपण कोणासाठीतरी प्रार्थना करतो. प्रार्थना करुन तुम्हाला फार काही मिळतेच असे नाही. त्या ऐवजी तुम्ही काहीतरी शारीरिक हालचार करुन प्रयत्न केले तर तुम्ही आणखी काही करु शकता. आपण प्रार्थनेचा इतका अतिरेक केला आहे की, आता केवळ तुरुंगातून बाहेर पडण्यासाठीच आम्ही प्रार्थना करत नाही. कारण तिथे त्यांची प्रार्थना काम करत नाही. प्रार्थना आणि सामाजिक प्रश्नांबाबत बोलताना कान्ये वेस्ट याने जोर देऊन सांगितले की, मी स्वत:च देव आहे. माझा देव मीच आहे. (हेही वाचा, Kanye West ची एक्स गर्लफ्रेंड Julia Fox चक्क बिकिनी घालून गेली किराणा सामानाची खरेदी करायला; Urfi Javed ला मिळाली नवी प्रतिस्पर्धी (See Photos))

कान्ये वेस्ट अमेरिकन रॅपर आहे. त्याचा जन्म 8 जून 1977, अटलांटा, जॉर्जिया, यू.एस येथे झाला. हा एक अमेरिकन निर्माता, रॅपर आणि फॅशन डिझायनर आहे. ज्याने 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस एक लोकप्रिय कलाकार म्हणून कारकीर्द मिळवली. त्याच्या कलाकृतीबद्दल प्रशंसकांनीही चांगलेच कौतूक केले आहे.



संबंधित बातम्या

IND-W vs WI-W 2nd T20I 2024 Preview: वेस्ट इंडिजला दुसऱ्या T20 मध्ये पुनरागमन करणार, की भारतीय महिला मालिका जिंकणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या दोन्ही संघाचे हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी लढाई, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

West Indies vs Bangladesh, 2nd T20I Match Live Streaming In India: वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात रंगणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या भारतात थेट प्रक्षेपण कधी, कुठे आणि कसे पाहाल

IND W Beat WI W 1st T20I Match Scorecard: पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी केला पराभव, तीतास साधूची प्राणघातक गोलंदाजी

Sambhal Temple News: यूपीच्या संभलमध्ये 46 वर्षांनंतर उघडलेल्या मंदिरात केली महादेवाची पूजा, भाविकात पाहायला मिळाले जल्लोषाचे वातावरण, व्हिडीओ व्हायरल