Kangana Ranaut On Bollywood Celebrities: अनंत अंबानीच्या लग्नात सेलिब्रेटींचा डान्स, कंगना रनौत हिस मिरच्या; ठसक्यात दिली प्रतिक्रिया
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचे प्री-वेडिंग फंक्शन गुजरातमधील जामनगर येथे पार पडले.
बॉलिवूडची (Bollywood) अभिनेत्री कंगना रनौतने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंगला (Anant Ambani And Radhika Merchant Pre-Wedding) गेलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे. अंबानींच्या पार्टीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींची कंगनाने चांगलीच कानउघडणी केली आहे. सोशल मीडिया पोस्ट करत बॉलिवूड सेलिब्रिटींना खडेबोल सुनावले आहे. कंगना रनौतची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कंगना रनौत आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरील स्टोरीवरून एक पोस्ट शेअर केली आहे. (हेही वाचा - Shah Rukh Khan Controversy: अनंत - राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमात शाहरुखने केला अभिनेता रामचरणचा अपमान, नेटकरी संतापले)
कंगना रनैतने या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'मी खूप आर्थिक संकटाचा सामना केला आहे पण लताजी आणि मी असे दोनच व्यक्ती आहोत ज्यांची गाणी ('फॅशन का जलवा', 'घनी बावरी हो गयी', 'लंडन ठुमकदा', 'साडी गली', 'विजय भवं' इ.) सर्वाधिक हिट झाली आहेत. पण मला पैशाचा कितीही मोह झाला तरी लग्नसोहळ्यात मी कधीच नाचले नाही.' या पोस्टमध्ये कंगनाने पुढे असे लिहिले की, 'अनेक सुपरहिट गाणीही मला ऑफर झाली होती. पण मी नकार दिला. अवॉर्ड शोपासूनही मी दूर राहिले. प्रसिद्धी आणि पैशाला नाही म्हणायला मजबूत व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठा लागते. शॉर्ट कटच्या जगात, आजच्या तरुणांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की फक्त इमानदारीने पैसे कमवावा.'
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीचे प्री-वेडिंग फंक्शन गुजरातमधील जामनगर येथे पार पडले. या कार्यक्रमात बॉलिवूडच्या अनेक स्टार्सनी हजेरी लावली. 1 ते 3 मार्च दरम्यान हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच हॉलिवुड स्टार्टसने देखील हजेरी लावली.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)