Thalaivi: कंगना रनौत चा आगामी चित्रपट थलाइवी च्या सेटवरील जयललिताचा लूक सोशल मीडियावर व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ने तिच्या आगामी ‘थलाइवी’ (Thalaivi) चित्रपटाच्या शूटिंगचा एका सीन पूर्ण केला आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडियावर या सीनचे काही फोटो शेअर केले आहेत. यात ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसून आली.
Thalaivi: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) ने तिच्या आगामी ‘थलाइवी’ (Thalaivi) चित्रपटाच्या शूटिंगचा एका सीन पूर्ण केला आहे. कंगनाने तिच्या सोशल मीडियावर या सीनचे काही फोटो शेअर केले आहेत. यात ती तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या भूमिकेत दिसून आली. लॉकडाऊननंतर कंगनाने थलाईवीच्या शुटिंगला सुरूवात केली होती. त्यासाठी ती दक्षिण भारतात गेली आहे.
कंगना रनौतने जयललिता (Jayalalithaa) आणि जयललिता यांच्या लूकमधील स्वत:चा फोटो तिच्या ट्विट अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. हे सर्व फोटो शेअर करताना कंगनाने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, "जया माँ च्या आशीर्वादाने थलाइवीचे आणखी एक शेड्यूल पूर्ण केलं आहे. कोरोना युगात बरेच काही बदलले आहे. परंतु, एक्शन आणि कट यांच्यात काहीही बदल झाले नाही. संपूर्ण टीमचे धन्यवाद." (हेही वाचा - Boycott Mirzapur 2 च्या ट्रेंडवर मुन्ना त्रिपाठी ऊर्फ दिव्येंदु शर्मा ने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'हा मूर्खपणा आहे')
दरम्यान, ‘थलाइवी’ हा चित्रपट तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात जयललिता यांची भूमिका करण्यासाठी कंगनाने आपले वजन सुमारे 20 किलोने वाढवले आहे. हा चित्रपट तामिळ, तेलगू आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.