Kangana Ranaut Slams Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर भडकली कंगना रनौत, म्हणाली तुम्ही तुमचा सम्मान गमावून बसला आहात

हिमाचल प्रदेश ही देवभूमि असून एका मुलीमुळे संपूर्ण राज्याचा अपमान करणे अत्यंत चुकीचे आहे असेही तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.

Kangana Ranaut | (Photo Credits-Twitter Video)

शिवसेनेच्या दस-या मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपल्या विरोधकांसह अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्यावर देखील निशाणा साधला. मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर करायचा आणि येथील मातीशी नमकहरामी करायची असे म्हणत त्यांनी कंगनावर टिकास्त्र सोडले आहे. जे लोक महाराष्ट्रावर आणि मुंबईवर आरोप करत आहेत, त्यांच्या राज्यात कदाचित गांज्याची लागवड केली जात असेल असेही ते यावेळी म्हणाले होते. या सर्वावर कंगना रनौत हिने ट्विटच्या माध्यमातून टिका केली आहे. मुख्यमंत्री हे नेपोटिजम सर्वात वाईट प्रोडक्ट आहे अशा शब्दांत कंगनाने मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. तुम्ही संपूर्ण भारताचा अपमान केला असून तुम्ही तुमचा सम्मान गमावून बसला आहात असेही तिने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.

हिमाचल प्रदेश ही देवभूमि असून एका मुलीमुळे संपूर्ण राज्याचा अपमान करणे अत्यंत चुकीचे आहे असेही तिने या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. Shiv Sena Dasara Melava 2020: मुंबईचा उल्लेख पाकव्याप्त काश्मीर करायचा आणि येथील मातीशी नमकहरामी करायची; मुख्यमंत्र्याचा कंगना रनौतवर शिवसेना दसरा मेळाव्यात निशाणा

पाहा व्हिडिओ:

मुख्यमंत्री तुम्ही एक तुच्छ व्यक्ती आहात. हिमाचल देवांची भूमि आहे. येथील गुन्हेगारीचे प्रमाण शून्य आहे. येथील जमीन उपजाऊ आहे. येथे किवी, डाळिंब आणि स्ट्रॉबेरीची शेती केली जाते असेही तिने सांगितले आहे. हिमाचल प्रदेश मध्ये गांजाची शेती केली जाते असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटले होते.

त्याचप्रमाणे मी तुमच्यासारखी आपल्या वडिलांच्या पॉवरमुळे आणि पैश्यामुळे पुढे आलेली नाही. काही लोकांकडे स्वत:चा पैसा आणि इज्जत असते. जी माझ्याकडे आहे असेही तिने सांगितले आहे.