Kangana Ranaut Twitter War: कंगना राणौत, राम कदम आणि भाजपाने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी; काँग्रेस नेते सचिन सावंत यांची मागणी

त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कंगनाला खडेबोल सुनावले होते. याशिवाय कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राजकीय नेते तसेच नेटीझन्सनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अशातचं काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

Sachin Sawant, Kangana Ranaut, Ram Kadam, Devendra Fadnavis (PC -PTI/ Facebook)

Kangana Ranaut Twitter War: बॉलिवूड अभिनेत्रा कंगना रणौत (Kangana Ranaut)ने सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून प्रकरणावरुन मुंबई पोलिसांवर अनेक आरोप लावले होते. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कंगनाला खडेबोल सुनावले होते. याशिवाय कंगनाने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर राजकीय नेते तसेच नेटीझन्सनी तिच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अशातचं काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

सचिन सांवत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपवर टीका करताना म्हटलं आहे की, 'कंगना रणौत म्हणजे “कंगना+भाजप IT सेल” कंगनाच्या ट्वीट, वक्तव्यांमागे भाजप आहे. या कृतघ्न महिलेच्या साथीने राम कदम यांनी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील 106 हुतात्म्यांचा, राणी लक्ष्मीबाईंचा व #आमचीमुंबई वर प्रेम करणाऱ्या सर्वांचा घोर अपमान केला आहे.' (हेही वाचा - Marathi Actors On Kangana Ranaut: मुंबईबाबत कंगना रनौतने केलेल्या 'त्या' वक्तव्यानंतर मराठी कलाकार संतप्त; रितेश देशमुख, स्वप्नील जोशी, स्वरा भास्कर, केदार शिंदे यांचे रोखठोक प्रत्युत्तर)

महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी आहे. महाराष्ट्राचा सातत्याने जाणिवपूर्वक अपमान भाजप करत आहे. अजूनही भाजपाने कंगनाचा निषेध केला नाही. कंगना व राम कदम यांचे बोलविते धनी असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्रद्रोही भाजपने विनाशर्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणीदेखील सचिन सावंत यांनी केली आहे.

विवेक मोईत्रा यांच्यापासून राम कदम यांना ड्रग विक्री पुरवठ्याबाबत माहिती आहे. त्यांचे बॉलिवूड संबंधही घनिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी आम्ही करत आहोत. भाजपा कार्यालयात 53 वेळा फोन करून संदीप सिंग कोणाशी बोलत होता? भाजपाचे ड्रग माफिया संबंधदेखील उघड होतील,' असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.