Kangana Ranaut On Urmila Matondkar: कंगना रनौत हिची पुन्हा एकदा उर्मिला मातोंडकर हिच्यावर टीका, जाणून घ्या नव्या वादाचे कारण
त्यानंतर आता पुन्हा एकदा तिच्यावर कंगना हिने हल्लाबोल केला आहे.
Kangana Ranaut On Urmila Matondkar: बॉलिवूड मधील नेहमीच आपले मत ठामपणे मांडणारी अभिनेत्री कंगना रनौत हिच्यावर गेल्या काही दिवसांपासून युजर्सकडून आपल्या विधानांमुळे टीका केली जात आहे. तसेच काही जणांनी कंगनाचे समर्थन ही केल्याचे दिसून आले. याच दरम्यान कंगना हिने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर अत्यंत वाईट शब्दात टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा तिच्यावर कंगना हिने हल्लाबोल केला आहे.(Kangana Ranaut च्या खार येथील घरावरही पडणार हातोडा? घर बनविताना अभिनेत्रीने केले नियमांचे उल्लंघन; मुंबई कोर्टाने फेटाळून लावली कंगनाची याचिका)
खंरतर उर्मिला मातोंडर हिने 3 कोटी रुपयांची संपत्ती मुंबईत खरेदी केली आहे. यावरुन कंगना हिने उर्मिलावर निशाणा साधत असे म्हटले की, प्रिय उर्मिला जी मी स्वत:च्या मेहनीते घर बनवले. ते सुद्धा काँग्रेस तोडत आहेत. खरंच भाजपला खुश करुन माझ्या हाती फक्त 20-30 प्रकरण कळली आहेत. जर मी तुझ्यासारखीच समजूतदार असती तर काँग्रेसला खुश केले असते. किती मुर्ख आहे मी नाही?
कंगना रनौत हिच्या या कमेंटवर उर्मिलाने एक व्हिडिओ शेअर करत तिला उत्तर दिले आहे. उर्मिला हिने म्हटले की, एक बैठक करुयात. त्यावेळी मी सर्व कागदपत्रांसोबत येईन आणि कसे तिने मेहनतीने 25 वर्षात हे घर खरेदी केले आहे. पुढे असे ही म्हटले की, माझ्याकडे कागदपत्र आहेत. फ्लॅट मी तेव्हाच खरेदी केला ज्यावेळी मी राजकरणात आली सुद्धा नव्हती. तसेच कंगना हिला वाय प्लस पद्धतीची दिलेल्या सुरक्षिततेबद्दल ही प्रश्न उपस्थितीत केले आहेत.(Kangana Ranaut ला कायदेशीर नोटीस; शेतकरी आंदोलनातील आजींबाबत फेक ट्वीट केल्याने वाढल्या अडचणी)
उर्मिला हिने पुढे असे ही म्हटले की, तु म्हटले होते एनसीबीला बॉलिवूडमधील काही कलाकारांची लिस्ट देणार आहे. ज्यामुळे ड्रग्ज माफिया यांचा खात्मा होईल. मी तुला विनवणी करीन की तु लिस्ट दे. तुझ्या प्रतिक्रियेची वाट पाहेन.