Kangana Ranaut On Mahesh Bhatt: दिग्दर्शक महेश भट्ट यांचं मूळ नाव अस्लम, अभिनेत्री कंगणा रनौतचा खळबळजनक दावा

यावेळी अभिनेत्री कंगणा रनौतने कुठल्या अभिनेत्या किंवा अभिनेत्रीवर नाही तर थेट बॉलिवूडचे प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट याच्यावर निशाणा साधला आहे.

अभिनेत्री कंगणा रनौत (Kangana Ranaut) तिच्या अनोख्या सिनेमांप्रमाणेच चर्चेत असते ती तिच्या सोशल मिडीया पोस्टसाठी (social Media Post). अनेकदा खळबळजनक पोस्ट (Post) करत कंगणा स्वतवर वाद ओढावून घेते असं अनेकजण म्हणतात. पण यावेळी कंगणाने कुठल्या अभिनेत्या किंवा अभिनेत्रीवर नाही तर थेट बॉलिवूडचे प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट (Director Mahesh Bhatt) याच्यावर निशाणा साधला आहे. एवढचं नाही तर महेश भट्ट (Mahesh Bhatt)) स्वत:ची सांगत असलेली ओळख ही खोटी आहे असा खळबळजनक दावा अभिनेत्री कंगणा रनौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरी (Instagram) मधून केला आहे. ज्यानंतर बॉलिवूडसह (Bollywood) अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कंगणाने अचानक महेश भट्टावर निशाणा साधण्याचा कारण काय हे स्पष्ट नसलं तरी कंगणाच्या या  इंस्टाग्राम स्टोरीची सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार चर्चा होत आहे.

 

अभिनेत्री कंगणा रनौतने (Actress Kangana Ranaut) तिच्या इंस्टाग्राम स्टोरी शेअर (Instagram Story Share) केली आहे. ज्यात तिने लिहलं आहे अभिनेत्री कंगना (Kangana Ranaut)) म्हणते, महेश भट्ट (Mahesh Bhatt) यांचं खरं नाव आहे अस्लम (Aslam). ते त्यांनी वापरावं. धर्मांतर केलेलं नाव कशाला वापरता? हे नाव सुंदर आहे. पुढे ती लिहिते. महेश भट्ट हिंसाचार घडवण्यासाठी लोकांना भडकवतायत. ही पोस्ट सध्या सोशल मिडीयावर (Social Media) चर्चेत आहे. (हे ही वाचा:- चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी मुंबईत घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट)

 

दिग्दर्शक महेश भट्ट (Director Mahesh Bhatt) यापूर्वीही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहे. त्यांची थोरली लेक पूजा भट्ट (Pooja Bhatt) बाबतचं वक्तव्य असो वा अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Actress Rhea Chakraborty) बाबतचं नातं. पण महेश भट्टच्या (Mahesh Bhatt) नावाबाबतचा हा वाद पहिल्यांदाच पुढे आला आहे. तरी कंगणाच्या या खळबळजनक दाव्यावर  दिग्दर्शक महेश भट्ट काय प्रतिक्रीया देणार यावर सर्वांच लक्ष लागलं आहे.