Photo : कंगणा रानौतच्या 'मणिकर्णिका'चा टीझर 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला !

बॉलिवूड क्विन कंगणा रनौतचा आगामी सिनेमा 'मणिकर्णिका : द क्विन ऑफ' झांसी या ऐतिहासिक सिनेमाचा टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

कंगना रानौत (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड क्विन कंगणा रानौतचा आगामी सिनेमा 'मणिकर्णिका : द क्विन ऑफ' झांसी या ऐतिहासिक सिनेमाचा टीझर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर कंगणाच्या टीमने कंगणाचा एक भारदस्त फोटो शेअर केला आहे.

मणिकर्णिका हा सिनेमा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारलेला असून कंगणा त्यात झाशीच्या राणीची भूमिका साकारत आहे. 2 ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा मुहूर्त साधत टीझर प्रदर्शित केला जाणार आहे.

कंगणाच्या टीमने शेअर केलेल्या फोटोत कंगणाने लाल रंगाची साडी नेसली असून भरपूर दागिने घातले आहेत. तिच्या मागे गणरायाची मुर्ती देखील पाहायला मिळत आहे. शेअर केलेल्या फोटोतून टीझर प्रदर्शनाची तारीख सांगण्यात आली आहे.

कंगणाचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा 25 जानेवारी 2019 ला रसिकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील ब्राह्मण समुहाने सिनेमात ऐतिहासिक तथ्यांसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.