अभिनेत्री कंगना रनौत हिच्या वादग्रस्त विधानामुळे राखी सावंत हिला बसला धक्का, थेट रुग्णालयात दाखल
तिने असे म्हटले की, भारताला स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले आहे. यावरुनच आता राखी सावंत (Rakhi Sawant) हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिने नुकत्याच भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यावरुन जे वादग्रस्त विधान केले आहे त्यावरुन संताप व्यक्त केला जात आहे. तिने असे म्हटले की, भारताला स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले आहे. यावरुनच आता राखी सावंत (Rakhi Sawant) हिने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने असे म्हटले की, तिला कंगनाच्या या वादग्रस्त विधानामुळे धक्का बसल्याने थेट रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे. याबद्दलचा एक व्हिडिओ सुद्धा तिने शेअर केला आहे. त्यामध्ये तिने कंगना हिला खुप सुनावले आहे.
राखी सावंत हिने असे म्हटले की, मी रुग्णालयात असून नर्स माझे चेकअप करतेय. मी आजारी पडली, मला धक्का बसलाय. एक अभिनेत्री तिला नुकताच पद्मश्री पुरस्कार दिला गेला तिने असे म्हटले की, आपल्याला स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिलाले आहे. पण भीक म्हणून तुला पद्मश्री मिळाला आहे असे राखीने कंगना हिला सुनावले आहे. आमच्या देशातील जवानांनी कारगिलच्या युद्धात जो विजय मिळवला होता तर त्यांचे बलिदान व्यर्थ आहे का? ज्या प्रकारे कमेंट्स केल्या जात आहेत त्याबद्दल दु:ख होत आहे.(कंगणाच्या 'त्या' वादग्रस्त विधानावर ज्येष्ठ अभिनेते 'विक्रम गोखलें'कडून समर्थन, वाचा काय म्हणाले..)
दरम्यान, कंगना रनौत हिने एका न्यूज चॅनलच्या कार्यक्रमात असे म्हटले की, 1947 मध्ये स्वातंत्र्य नव्हे तर भीक मिळाली होती. कंगनाने उलट असे म्हटले की, स्वातंत्र्य 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मिळाले. तिच्या या वादग्रस्त विधानामुळे आता संताप व्यक्त केला जात आहे. विविध स्तरातून कंगना रनौत हिच्या विधानामुळे टीका केली जात आहे.