Kaala Paani Web Series Trailer: अंगाला काटा आणणारा 'काला पानी' वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज, लवकर प्रेक्षकांच्या भेटीला
या सीरिजचा ट्रेलर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करणाऱ्यात आला आहे.
Kaala Paani Web Series Trailer: नेटफ्लिक्सच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काला पानी हा वेब सीरिज लवकरच रिलीज होणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करणाऱ्यात आला आहे. प्रेक्षकांना हा ट्रेलर पाहून सीरिजची उत्सुकता लागली आहे. काला पानी सीरिज मध्ये काही मराठी कलाकार सुद्धा झळकणार आहे. 'काला पानी' या सीरिजमध्ये मोना सिंह, आशुतोष गोवारीकर, अमेय वाघ, सुकांत गोयल, विकास कुमार, अरुशी शर्मा, राधिका मेहरोत्रा, चिन्मय मांडलेकर आणि पूर्णिमा इंद्रजीत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 18 ऑक्टोबर 2023 रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांनी हा ट्रेलर पाहून चांगला प्रतिसाद दिला आहे. या सीरिज मध्ये काही घटना या अंगावर काटा आणणाऱ्या आहे. अंदमान निकोबार येथील रहिवासीर बेटांच्या काळ्या पाण्यात कसे जगतात हे या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.