जॉनी लीवर ने आपल्या विनोदी अंदाजात नागरिकांना दिला घरी राहण्याचा सल्ला, पोट धरून हसायला लावणार व्हिडिओ नक्की पाहा

घरात कंटाळलेले जॉनी लिव्हर जेव्हा बिल्डींगच्या कम्पाउंडमध्ये जाण्यासाठी त्यांच्या आईने घेतलेली भूमिका ऐकून तुम्ही पोट धरुन हसाल. या व्हिडिओमध्ये आपल्याला घराबाहेर पडणे किती महागात पडले आहे हे जॉनी लिव्हर सांगत आहे.

Johny Lever (Photo Credits: Instagram)

कोरोना व्हायरसशी लढा द्यायचा असेल ल तर त्यासाठी 'घरात राहणे' हा एकमेव उपाय आहे असा संदेश शासकीय यंत्रणापासून ते कलाकार मंडळी नागरिकांना देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बॉलिवूडचा सुप्रसिद्ध विनोदाचा बादशहा जॉनी लीवर (Johnny Lever) यांनीही आपल्या विनोदाच्या कलेतून नागरिकांना घरी बसण्याचा सल्ला दिला आहे. आतापर्यंत प्रत्येक कलाकाराने आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून आपल्या तमाम देशवासियांना लॉकडाऊन मध्ये घराबाहेर न पडण्याचा आणि स्वत:ची काळजी घेण्याचा सल्ला दिला. मात्र घरात कंटाळलेले जॉनी लीवर जेव्हा बिल्डींगच्या कम्पाउंडमध्ये जाण्यासाठी त्यांच्या आईने घेतलेली भूमिका ऐकून तुम्ही पोट धरुन हसाल.

या व्हिडिओमध्ये आपल्याला घराबाहेर पडणे किती महागात पडले आहे हे जॉनी लीवरसांगत आहे.

पाहा व्हिडिओ:

 

View this post on Instagram

 

🤣🤣 He’s jusy the besssst ya!!! Johnny Lever asks peeps to stay at home... apne ishtyle mein ❤️❤️ FOLLOW 👉 @voompla INQUIRIES 👉 @ppbakshi . #voompla #bollywood #johnnylever #bollywoodstyle #bollywoodfashion #mumbaidiaries #delhidiaries #indianactress #bollywoodactress #bollywoodactresses

A post shared by Voompla (@voompla) on

अभिनेत्री सुश्मिता सेन (Sushmita Sen) हिने देखील कोरोनावर मात करण्यासाठी एक रामबाण औषधच सांगितले आहे. असे ज्याने कोरोना आपल्या देशातून पळून जाऊ शकतो. या औषधाचे नाव आहे 'Stay Home'. म्हणजे हा आजार होऊन जीवाशी खेळण्यापेक्षा घरात राहणे हे याच्यावर 100% परिणामकारक ठरेल असे औषध आहे. कुशल बद्रिके याने आपल्या कुटूंबासमवेत Coronavirus वर रचले भारूड, लोककलेच्या माध्यमातून केली जनजागृती

ऋतिकनेही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन घरीच राहण्याचे आवाहन केले आहे. तसंच विनाकारण बाहेर पडू नका असेही त्याने सांगितले. या व्हिडिओतून ऋतिकने खास लहानग्यांना संदेश दिला आहे. प्रत्येक कुटुंबातील लहान मुलांकडे त्याने मदत मागितली आहे. ऋतिक म्हणाला की, मला ठाऊक आहे घरातील काही मोठी माणसे काही गोष्टी ऐकत नाहीत. पण तुम्ही त्यांना समजवा. घर आणि कुटुंबाच्या काळजीने ते घराबाहेर पडणार नाहीत. या परिस्थितीत घराबाहेर पडणे यात कोणतीही बहादुरी नसल्याचेही त्याने सांगितले.