Satyameva Jayate 2: जॉन अब्राहम चा आगामी चित्रपट 'सत्यमेव जयते 2' च्या शूटिंगला सुरुवात, लखनऊ मध्ये होत आहे चित्रीकरण

आज सकाळीच जॉन अब्राहम मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसला होता आणि आजच या 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटाच्या शूटिंगला लखनऊमध्ये सुरुवात झाली. याचाच अर्थ जॉन या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लखनऊमध्ये गेला आहे.

Satyameva Jayate 2: जॉन अब्राहम चा आगामी चित्रपट 'सत्यमेव जयते 2' च्या शूटिंगला सुरुवात, लखनऊ मध्ये होत आहे चित्रीकरण
John Abraham and Divya Khosla Kumar (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमची (John Abraham) सध्या सर्वत्र चर्चा आहे. सत्यमेव जयते, परमाणू यांसारख्या दमदार चित्रपटातून तितक्याच ताकदीचा अभिनय करुन त्याने चाहत्यांची मने जिंकली आहे. यात बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करणारा सत्यमेव जयते (Satyameva Jayate 2) या चित्रपटाचा लवकरच दुसरा पार्ट येणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. लॉकडाऊनमुळे या चित्रपटाचे शूटिंग रखडले होते. मात्र आता या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून चित्रपट समीक्षक तरन आदर्श याने सोशल मिडियाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

आज सकाळीच जॉन अब्राहम मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसला होता आणि आजच या 'सत्यमेव जयते 2' या चित्रपटाच्या शूटिंगला लखनऊमध्ये सुरुवात झाली. याचाच अर्थ जॉन या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लखनऊमध्ये गेला आहे. या चित्रपटात जॉन सोबत दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.  Romeo Akbar Walter Trailer: पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना धडा शिकवणारा 'रॉ' चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला (Video)

या चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झवेरी यांनी सांगितले आहे की, आम्ही या चित्रपटाचे बहुतांशी शूटिंग हे लखनऊमध्ये करणार आहोत. यात महाल महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच काही लाईव सीनही आहेत. ज्यासाठी काही जागा पूर्ण बंद ठेवणार आहोत. ज्यामुळे लोकांची गर्दी होणार नाही. त्यासोबत आम्ही लखनऊच्या रस्त्यांवर देखील शूटिंग करणार आहोत. अशा कठिण काळात जॉनने शूटिंगसाठी तयारी दर्शविल्याने दिग्दर्शक जॉनचे कौतुक करत आहेत.

कोरोना महामारीत या चित्रपटाचे लाईव शूटिंग करणे थोडे धोकादायक आहे. मात्र त्यासोबत लोकांचे मनोरंजन करणेही आमच्यासाठी तितकेच जरूरीचे आहे. सत्यमेव जयते 2 हा पहिल्या भागापेक्षा खूप वेगळा आणि जबरदस्त असणार आहे हे नक्की असा विश्वास देखील मिलाप झवेरी यांनी दाखवला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 20, 2020 04:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).