Taliban सोबत RSS ची तुलना केल्याने जावेद अख्तर यांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन
त्यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केले गेले.
बॉलिवूड मधील प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी पुन्हा एकदा वादाला तोंड फोडले आहे. त्यांनी केलेल्या विधानावरुन त्यांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केले गेले. जावेद अख्तर यांनी विधान करताना असे म्हटले की, आरएसएस, वीचएपी आणि बजरंग दल हे तालिबान्यांसारखेच आहे. यांच्या मार्गात भारत हा अडवणूकीचा मार्ग बनला आहे. त्यांना थोडी तरी जागा मिळाल्यास ते सीमा पार करण्यास विलंब लावणार नाही. याच कारणावरुन जावेद अख्यतर वादाच्या कचाट्यात सापडले आहेत.
बीजेपीच्या युवा वर्गाने जावेद अख्यतर यांच्या जुहू स्थित घराबाहेर त्यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडले. त्यांनी असे म्हटले की, आरएसएस मधील लोक कठीण काळात मदत करतात. अशातच जावेद अख्तर यांनी त्यांची तालिबान्यांसोबत तुलना कशी केली? या प्रकरणी त्यांनी माफी मागावी. आम्हाला अत्यंत लाज वाटत आहे. ऐवढा शिकलेला व्यक्ती अशा प्रकारची विधाने करतो.(Kangana Ranaut हिच्या थलाइवी सिनेमाच्या विरोधात कटकारस्थान रचले जातेय? अभिनेत्रीने व्हिडिओ पोस्ट करत दिले स्पष्टीकरण)
तर भाजपने जावेद अख्यर यांच्या विधानामुळे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुद्धा निशाणा साधला आहे. त्यांनी असे म्हटले की, अख्तर यांनी अफगाणिस्तानात जावे आणि तालिबानी दहशतवाद्यांसोबत रहावे. तेव्हाच त्यांना खरे काय ते कळेल. आरएसएस संघटना देश प्रेम आणि सेवा भावचे संस्कार वाढवणारे विद्यापीठ आहे.