Janhvi Kapoor ने मुंबईत खरेदी केले आलिशान घर, किंमत ऐकून तुमचेही डोळे भिरभिरतील- रिपोर्ट

जुहूमधील एका बिल्डिंगमध्ये पूर्ण तिसरा मजला व्याप्त असलेले घर तिने घेतले आहे.

Janhvi Kapoor (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमध्ये 'धडक' चित्रपटातून पदार्पण करणारी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) हिचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. जान्हवी सध्या 23 वर्षांची आहे. तसेच बॉलिवूडमध्ये येऊन सुद्धा तिला जास्त दिवस झाले नाही. असे असूनसुद्धा जान्हवीने स्वत: च्या हिमतीवर मुंबईत आलिशान घर घेतले आहे. या घराची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसले. इतक्या कमी वयात इतकं महागडं घर जान्हवीने इतक्या कमी वेळात घेतल्यामुळे चाहत्यांचेही चक्रावले आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, मुंबईतील जुहू परिसरात जान्हवीने हे घेर घेतले आहे. जुहूमधील एका बिल्डिंगमध्ये पूर्ण तिसरा मजला व्याप्त असलेले घर तिने घेतले आहे.

रिपोर्टनुसार, या घराची किंमत 39 कोटी इतकी आहे. ज्याचे 78 लाख स्टॅम्प ड्यूटी जान्हवीने याआधीच भरली आहे. जान्हवीच्या या हिंमतीचे तिचे चाहते कौतुक करत असून तिचे अभिनंदन देखील करत आहे.हेदेखील वाचा- Urmila Matondkar Purchases New Luxury Office: ऊर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खरेदी केलं 3.75 कोटीचं आलिशान कार्यालय?

जान्हवीने 2018 मध्ये धड़क चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात तिच्यासोबत अभिनेता इशान खट्टर याने देखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. त्यानंतर जान्हवीने गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल या चित्रपटात दिसली होती. त्यामुळे करिअरच्या इतक्या छोट्या कारकिर्दीत जान्हवीने इतकी मोठी उडी घेतल्याने सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.

दरम्यान जान्हवी चित्रपटांव्यतिरिक्त एड आणि ब्रांड एंडोर्ससुद्धा करते. त्याचबरोबर ती इव्हेंट्स आणि अनेक कंपन्यांशी टायअपसुद्धा केले आहे. ज्यामधून तिला बक्कळ पैसा मिळत आहे. ज्यामुळे ती चित्रपटात येण्यापूर्वीच एक सेलिब्रिटी होती. मात्र असे असतानाही इतक्या मोठाल्या किंमतीचे घर घेणे हे सर्वांना बुचकळ्यात पाडणारे आहे.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच दोस्ताना 2 आणि रूही अफ्जा या चित्रपटांत दिसणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif