Jailer 2 Sequel: रजनीकांतच्या वाढदिवसानिमित्त 'जेलर' चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा; अभिनेता एकटाचं साकारणार 6 पात्र
जेलर-2 ची घोषणा करण्यात आली आहे. आता हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. रजनीकांत यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे 12 डिसेंबर रोजी निर्माते या चित्रपटाची संपूर्ण माहिती उघड करणार आहेत.
Jailer 2 Sequel: सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यावर्षी 12 डिसेंबर रोजी 74 वा वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रजनीकांत त्यांच्या 400 कोटींच्या 'जेलर' (Jailer) चित्रपटाच्या सिक्वेल (Jailer 2 Sequel) चा प्रोमोही रिलीज करत आहेत. जेलर-2 ची घोषणा करण्यात आली आहे. आता हा चित्रपट लवकरच थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. रजनीकांत यांच्या वाढदिवसादिवशी म्हणजे 12 डिसेंबर रोजी निर्माते या चित्रपटाची संपूर्ण माहिती उघड करणार आहेत.
नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित चित्रपटाचा प्रोमो शूट 5 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचा प्रोमो निर्माते त्याच्या वाढदिवसाला रिलीज करतील, असे एका ट्रेड ट्रॅकरने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. रजनीकांतचा दुसरा चित्रपट कुलीचे निर्माते त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित होणाऱ्या थलाईवर चित्रपटाच्या चाहत्यांसाठी काहीतरी खास तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा अर्थ या डिसेंबरमध्ये चाहत्यांनी दुहेरी सप्राईज मिळण्याची शक्यता आहे. (हेही वाचा - Rajinikanth Emotional Note After Getting Discharged: डिस्चार्ज मिळाल्यानंतर रजनीकांत यांची भावनिक पोस्ट; पंतप्रधान मोदींसह मानले सर्व चाहत्यांचे आभार)
जेलर 2 हा रजनीकांतच्या 2023 च्या सुपर-हिट क्राईम-थ्रिलरचा सिक्वेल आहे. या अभिनेत्याने या चित्रपटात निवृत्त पोलिसाची भूमिका साकारली होती आणि या चित्रपटाने जगभरात 600 कोटींहून अधिक कमाई केली होती. हा चित्रपट तामिळनाडू आणि सुपरस्टारच्या दीर्घ कारकीर्दीतील सर्वात हिट ठरलेला चित्रपट बनला आहे. यात मोहनलाल, शिवा राजकुमार, रम्या कृष्णन, जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, योगी बाबू आणि वसंत रवी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. (हेही वाचा - Rajinikanth Hospitalized: सुपरस्टार रजनीकांत चेन्नईच्या रुग्णालयात हृदय शस्त्रक्रियेसाठी दाखल, प्रकृती स्थिर!)
View this post on Instagram
दरम्यान, कुली चित्रपटात नागार्जुन, उपेंद्र, सौबिन शाहिद, श्रुती हासन आणि सत्यरन यांच्या प्रमुख भुमिका असून हा एक ॲक्शन-थ्रिलर चित्रपट आहे. निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या रिलीजची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु 2025 च्या पहिल्या सहामाहीत तो पडद्यावर येण्याची अपेक्षा आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 29, 2024 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

