Jacqueline Fernandez हिचा Topless फोटो पाहिल्यानंतर Urvashi Rautela झाली स्तब्ध; 'अशी' केली कमेंट
Jacqueline Fernandez (Photo Credits: Instagram)

Jacqueline Fernandez Topless Photo: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीज नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे आपण पाहिले आहे. नुकताच जॅकलिन फर्नांडिसचा एक ब्लॅक अँड व्हाइटमधील अतिशय बोल्ड फोटो समोर आला आहे. जॅकलिन फर्नांडिसने स्वत: च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा हॉट फोटो शेअर केला आहे. जॅकलीनचा हा फोटोने सोशल मीडियावर (Social Media) आग लावली आहे. जॅकलीनच्या या फोटोचे बॉलिवूडच्या अनेक कलाकरांनी कौतूक केले आहे. मात्र, अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) या फोटोवर केलेल्या कमेंटची अधिक चर्चा रंगली आहे.

जॅकलीनने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये 'वावा' असे लिहले आहे. तिचा हा फोटो पाहून उर्वशी रौतेला स्तब्ध झाली आणि त्यावर ती म्हणाली की, "आज इंटरनेट वितळणार... देवी. याशिवाय मनीष पॉल यांनीही या फोटोवर कमेंट करत जॅकलीनचे कौतूक केले आहे. हे देखील वाचा-Twinkle Khanna ने पती Akshay Kumar सोबतचा फोटो शेअर करुन तमाम जोडप्यांना दिला घटस्फोट न होण्याचा मूलमंत्र

जॅकलीनची इंस्टाग्राम पोस्ट-

बॉलिवूडच्या अनेक अगामी चित्रपटात जॅकलीन झळकणार आहे. ज्यात अक्षर कुमारचा चित्रपट बच्चन पांडे, सलमान खानचा चित्रपट राधे, जॉन अब्राहमचा चित्रपट अटॅक आणि रणवीर सिंहचा चित्रपट सर्कसमध्येही दिसणार आहे. एवढेच नव्हेतर यावर्षीचा अक्षय कुमारचा बिग बजेट चित्रपट राम सेतूमध्येही झळकणार आहे, अशी माहिती समोर येत आहे.