
बॉलिवूडचे अनेक अभिनेता, अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी अनेकजण आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट असल्याचे आपण पाहिले आहे. तसेच इंस्टाग्राम, फेसबूक आणि ट्विटरच्या माध्यमातून ते अनेक गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यातच बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीज हीनेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती टॉपलेस असल्याचे दिसत आहे. ज्यामुळे या फोटोने सोशल मीडियावर आग लागली आहे. हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जॅकलीन फर्नांडीज हिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती टॉपलेस दिसत आहे. ब्लॅक अँड व्हाईट फिल्टर्सने एडिट केलेल्या या फोटोने जॅकलीन फर्नांडीजच्या चाहत्यांना वेड लावले आहे. हा फोटोला अनेकांच्या प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. तसेच काही चाहत्यांनी जॅकलिनच्या सौंदर्याचे देखील कौतूक केले आहे. हे देखील वाचा- Nidhi Bhanushali Bikini Pics: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' टीव्ही मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली बिकनीतील 'या' फोटोमुळे चर्चेत
इंस्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
सध्या जॅकलीन धर्मशाळेत भूत-पोलीस चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटातील तिच्या भूमिकेबद्दल विचारले असता जॅकलीन म्हणाली की, "माझे पात्र सुपर सेक्सी आणि ग्लॅमरस आहे. नुकतीच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. जॅकलिनचे या चित्रपटातील पात्र इतर पात्रांपेक्षा अनोख आणि वेगळे असणार असल्याचे तिने सांगितले आहे
माहितीनुसार, जॅकलीन पुढील एक महिन्यासाठी हिलस्टेशन्समध्ये राहणार आहेत. त्यानंतर ती मुंबईत परतणार आहे आणि रणवीर सिंगसोबत रोहित शेट्टी यांच्या चित्रपट सर्कसच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.