Jacqueline Fernandez New House: जॅकलीन फर्नांडिसने मुंबईत खरेदी केले आलिशान घर; किंमत जाणून बसेल तुम्हाला धक्का

जॅकलीन फर्नांडिसने जुहू सोडले असून आता तिने वांद्रे येथील पाली हिल येथे नवीन घर घेतले आहे. याठिकाणी सैफ अली खान, करीना कपूर, रणबीर कपूर आणि आलिया भट्टसह अनेक सेलिब्रिटी राहतात.

Jacqueline Fernandez New House: जॅकलीन फर्नांडिसने मुंबईत खरेदी केले आलिशान घर; किंमत जाणून बसेल तुम्हाला धक्का
Jacqueline Fernandez | (Photo Credit - Facebook)

Jacqueline Fernandez New House: बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ने मुंबईत एक नवीन आलिशान घर खरेदी केले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अभिनेत्री याआधी प्रियांका चोप्राच्या जुहूच्या घरात राहत होती, जे तिने 2021 मध्ये घेतले होते. जॅकलीन फर्नांडिसने जुहू सोडले असून आता तिने वांद्रे येथील पाली हिल येथे नवीन घर घेतले आहे. याठिकाणी सैफ अली खान, करीना कपूर, रणबीर कपूर आणि आलिया भट्टसह अनेक सेलिब्रिटी राहतात. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी अभिनेत्रीच्या घराचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जॅकलिनची बिल्डिंग दिसत आहे. तथापि, अभिनेत्रीने अद्याप तिच्या नवीन घराबाबत कोणतेही वक्तव्य दिलेले नाही.

जॅकलीन फर्नांडिसचे नवीन घर एका बहुमजली अपार्टमेंटमध्ये असल्याचे व्हिडिओमधून समोर आले आहे. अभिनेत्रीचे हे घर 1119 चौरस ते 2557 चौरस मीटरपर्यंत पसरले आहे. टाईम्सच्या रिपोर्टनुसार या घराची किंमत 12 कोटी रुपये आहे. मात्र, जॅकलिन तिच्या नवीन अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली आहे की, नाही हे स्पष्ट झालेले नाही. (हेही वाचा - Taali Motion Poster: 'लाख गिरा दे बिजली मुझपर...'; ट्रान्सजेंडर ची भूमिका साकारणाऱ्या सुष्मिता सेनच्या 'ताली' चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज)

 

View this post on Instagram

 

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

दरम्यान, 2021 मध्ये, जॅकलिन फर्नांडिस प्रियंका चोप्राच्या जुहूच्या घरात राहत होती. जॅकलीनने प्रियांकाकडून ही इमारत 7 कोटी रुपयांना विकत घेतली. ज्याला कर्मयोग असे नाव दिले जात आहे. यापूर्वी जॅकलीन वांद्रे येथे भाड्याच्या घरात राहत होती.

जॅकलीनच्या वर्क्रफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री वैभव मिश्राच्या फतेह चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये ती सोनू सूद आणि विजय राज यांच्यासोबत काम करणार आहे. जॅकलीनने या वर्षी मार्चमध्ये क्राईम अॅक्शन चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण केले. याशिवाय ती अभिनेत्री आदित्य दत्तच्या क्रैक - जीतेगा तो जियेगा या अॅक्शन स्पोर्ट्स चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात ती विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपालसोबत दिसणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jul 02, 2023 05:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).