Rahul Vaidya-Disha Parmar यांचे झाले लग्न? जाणून घ्या नवविवाहित जोडप्याच्या वेषातील व्हायरल फोटोमागचे सत्य
आपण लग्न केले आहे की नाही याचे उत्तर त्याने ETimes ला दिले आहे.
बिग बॉस 14 चा सेमी फायनलिस्ट ठरलेला स्पर्धक तसेच सुप्रसिद्ध गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) ने नुकताच सोशल मिडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोने त्याचे चाहते बुचकळ्यात पडले आहे. राहुल वैद्य आणि त्याची गर्लफ्रेंड दिशा परमार (Disha Parmar) हे लग्नबंधनात अडकलेले या फोटोमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये दोघांनी नवविवाहित जोडप्याचा वेष परिधान केला असून हे फोटो पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुळात त्याने असे गुपचूप लग्न का केले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या सर्वावर राहुल वैद्यने मौन सोडले आहे. आपण लग्न केले आहे की नाही याचे उत्तर त्याने ETimes ला दिले आहे.
राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी लग्न केले नसून त्यांच्या आगामी म्यूजिक व्हिडिओचे हे शूट आहे. या शूटदरम्यान काढलेले हे फोटो आहेत. हे फोटोज सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर राहुल वैद्यला याबाबत विचारण्यात आल्यानंतर, "काही लोक आपले प्रेम लपून-छपून करतात. मात्र आम्ही आमचे लग्न 'डंके की चोट' पे करूं" असे राहुल वैद्यने Etimes शी बोलताना सांगितले.हेदेखील वाचा- Who is Disha Parmar? Bigg Boss 14 चा स्पर्धक राहुल वैद्य ने लग्नाची मागणी घातलेली मुलगी दिशा परमार नेमकी आहे तरी कोण, वाचा सविस्तर
या फोटोमध्ये राहुल वराचा वेष परिधान केला आहे. तर दिशाने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. या म्यूजिक व्हिडिओचे शूट व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये जैस्मिन भसिन आणि अली गोनी सुद्धा दिसत आहे. त्यामुळे अनेकांनी राहुल आणि दिशाने लग्न केले या गोष्टीवर विश्वास ठेवला. इतकंच नव्हे तर अनेकांना या दोघांना सोशल मिडियाद्वारे लग्नाच्या शुभेच्छा दिल्या.