Irrfan Khan चा मुलगा Babil Khan ने पत्रकारांना कडक शब्दांत फटकारले, Filmfare Awards 2021 कार्यक्रमावेळी विचारला होता 'हा' प्रश्न
यावेळी पत्रकारांनी त्याला आपण नशेत आहे का? असा प्रश्न विचारला.
बॉलीवुड अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) जरी या जगात राहिला नसला तरी त्याचा परिवार आणि त्याचे चाहते आजही त्याची आठवण काढल्याशिवाय राहत नाहीत. फिल्मफेयर अवॉर्ड्स 2021 (Filmfare Awards 2021) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी इरफानचा मुलगा बाबिल खान रेड कारपेटवर पोहोचला. त्यावेळी त्याने पत्रकारांशी चर्चा केली. यावेळी पत्रकारांनी बाबिलला काही प्रश्न विचारले. हे प्रश्न ऐकून बाबिल खूपचं नाराज झाला. बाबिल ने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत पत्रकारांच्या प्रश्नावर नाराजी व्यक्त केली आणि त्याने पत्रकारांवर जोरदार घणाघात केला. यावेळी पत्रकारांनी त्याला आपण नशेत आहे का? असा प्रश्न विचारला.
बाबिल यांनी इंस्टाग्रामवर विचारले की, "मी तुम्हाला लोकांना सांगू इच्छितो की, काल मी फिल्मफेअर अवॉर्ड्स 2021 मध्ये हजेरी लावली. आणि माझ्या डोळ्याच्या आकारामुळे पत्रकारांनी मला विचारले की मी मद्यपान केलं आहे काय? तुम्ही छान प्रकारचे संशोधन केले. कारण मी जेव्हापासून ब्रम्हांड सोडलं तेव्हापासून मी असाचं शुद्ध आहे. माझा नैसर्गिक चेहरा मद्यधुंद असल्यासारखा आहे, हे सांगून तुम्ही खूप चांगले केले आहे. त्याबद्दल धन्यवाद, मी याचा वापर बॉलीवूडमध्ये करून लाखो रुपये कमवू शकतो. " (वाचा - Filmfare Awards 2021: दिवंगत अभिनेता इरफान खान ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, तर तापसी पन्नूच्या 'थप्पड' ने जिंकला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार; पहा फिल्मफेअर अवॉर्ड्सची संपूर्ण यादी)
इरफान खान यांचे 29 एप्रिल 2020 रोजी कोरोना इन्फेक्शनमुळे निधन झाले. इरफान खान शेवटी 'इंग्लिश मीडियम' चित्रपटात दिसला होता. त्यांना या चित्रपटाबद्दल फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सर्वोकृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आलं आहे. याशिवाय इरफानला लाइफ टाइम अचिव्हमेंट पुरस्काराही देण्यात आला आहे.