IPL 2020: प्रिती झिंटा ने 20 वेळा केली कोरोना टेस्ट; 'मी कोविड-19 टेस्टची क्विन' म्हणत शेअर केला व्हिडिओ
बॉलिवूड अभिनेत्री आणि किंग इलेव्हन पंजाब संघाची मालकीन प्रिता झिंटा ही सध्या आयपीएल 2020 चा सिजन सुरु असल्याने दुबईत आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या प्रीती झिंटाने अलिकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाची (Kings XI Punjab) मालकीन प्रिता झिंटा (Preity Zinta) ही सध्या आयपीएल 2020 (IPL 2020) चा सिजन सुरु असल्याने दुबईत (UAE) आहे. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या प्रीती झिंटाने अलिकडेच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती कोविड-19 टेस्ट (Covid-19 Test) करताना दिसत आहे. तसंच ती आपला अनुभव शेअर करत मी कोविड-19 टेस्टची क्विन असल्याचे तिने म्हटले आहे. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय कडून हॉटेल्स, ट्रेनिंग सेशन्स आणि इतर ठिकाणी सुरक्षित वातावरणासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
या व्हिडिओत प्रिती झिंटा म्हणते, "कोरोनाची ही माझी 20 वी टेस्ट असून मी आता कोविड टेस्टची क्विन झाली आहे." हा व्हिडिओ शेअर करताना तिने पोस्टमध्ये लिहिले की, "आयपीएल टीम सोबत असणं याबद्दल सर्वजण मला विचारत असतात. याची सुरुवात 6 दिवसांच्या क्वारंटाईनपासून झाली. दर 3-4 दिवसांनी कोविड ची टेस्ट करावी लागते. बाहेर फिरायला जाण्यास बंदी आहे. हॉटेल रुम, किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे रेस्टॉरंट, जीम आणि कार याव्यतिरीक्त तुम्ही कुठेही जावू शकत नाही. माझे ड्रव्हर्स आणि शेफ सुद्धा सोबतच असतात. त्यामुळे बाहेरील कुठल्याही व्यक्तीशी संपर्क येत नाही आणि बाहेरील जेवणही घ्यावे लागत नाही."
पहा व्हिडिओ:
दरम्यान, कोविड-19 च्या काळात सर्वांना सुरक्षित ठेवण्यासाठी घेत असलेल्या प्रयत्नांबद्दल प्रिती झिंटा हिने किंग्स इलेव्हन पंजाबचा स्टाफ, बीसीसीआय आणि Sofitel Dubai The Palm हॉटेलच्या स्टाफचे आभार मानले आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Oct 21, 2020 09:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

