IPL 2020: CSK vs RCB सामन्यातील विराट कोहली च्या दमदार खेळीनंतर अनुष्का शर्मा ने असा व्यक्त केला आनंद; विरुष्काच्या केमिस्ट्रीवर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

त्याच्या या जबरदस्त परफॉरमन्सवर पत्नी अनुष्का शर्मा हिने स्टेडियममधून विराटला फ्लाईंग किस दिले.

Anushka Sharma cheering for Virat Kohli (Photo Credits: Twitter)

आयपीएल (IPL)  सीजन 13 मधील 25 वा सामना काल (10 ऑक्टोबर) रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन संघांमध्ये रंगला. या सामन्यामध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने 37 धावांनी चेन्नई सुपर किंग्सवर विजय मिळवला. RCB संघाचा हा चौथा विजय असून यात विराट कोहलीने (Virat Kohli) दमदार खेळी केली. विराटने अवघ्या 52 चेंडूमध्ये 4 चौकार आणि 4 छषकारांसह संघासाठी सर्वाधिक 90 धावा केल्या. त्याच्या या जबरदस्त परफॉरमन्सवर पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) हिने स्टेडियममधून विराटला फ्लाईंग किस दिले. त्याचे उत्तरही विराटने फ्लाईंग किसने दिले. विरुष्काचे हे आनंदी क्षण कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यांचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

विरुष्काच्या या केमिस्ट्रीवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या आहेत. आयपीएलला सुरुवात झाल्यापासून अनुष्का शर्मा विराटसह दुबईत आहे. प्रेग्नेंसीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर अनुष्का पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली आहे. RCB च्या सुरुवातीच्या सामन्यात अनुष्का स्टेडियममध्ये दिसली नव्हती. त्यामुळे अनुष्काची सामन्याला हजेरी, विराटची दमदार खेळी याचे कनेक्शन चाहते जोडत आहेत. तसंच प्रेग्नेंट अनुष्काला पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता यातून नेटकरी या जोडीचे भरभरुन कौतुक करताना दिसत आहेत.

पहा नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया:

विराट-अनुष्काच्या आयुष्यात नवा पाहुणा जानेवारी 2021 मध्ये येणार असल्याचे त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले होते. (Anushka Sharma On RCB Win: अनुष्का शर्मा हिने आपल्या गरोदरपणाचा उल्लेख करत रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू च्या विजयावर दिली 'ही' प्रतिक्रिया, पाहा पोस्ट)

दरम्यान, RCB चा हा चौथा विजय होता. कालच्या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 8 पॉईंट्सची कमाई करत पाईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.