
Genelia D'Souza On Work-life Balance: अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) 'स्पिरिट' चित्रपट सोडल्यापासून, चित्रपटसृष्टीत शिफ्ट वेळा आणि कामाचे-जीवनाचे संतुलन (Work-life Balance) याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. खरंतर, दीपिकाने दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा (Director Sandeep Reddy) यांना आठ तासांची शिफ्ट करण्याची अट घातली होती. जेव्हा यावर सहमती झाली नाही तेव्हा दीपिकाने चित्रपट सोडला. यानंतर, अनेक स्टार दीपिकाच्या बचावात आले आहेत. त्याच वेळी, अभिनेत्री जेनेलिया डिसूझाला (Genelia D'Souza) अलीकडेच कामाचे-जीवनाचे संतुलन याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर जेनेलिया म्हणाली की, 'ती दररोज 10 तास काम करते. हे कठीण आहे पण अशक्य नाही.'
या महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या 'सितारे जमीन पर' चित्रपटात जेनेलिया डिसूझा दिसणार आहे. एका माध्यमाशी झालेल्या संभाषणात, जेनेलिया डिसूझा म्हणाली की, जेव्हा दिग्दर्शक कामाचे तास वाढवतात तेव्हा ती समायोजन करते. हे कठीण आहे पण अशक्य नाही. मी दिवसाला 10 तास काम करते. अनेकदा दिग्दर्शक 11 किंवा 12 तासांपर्यंत काम करून घेतात. परंतु, ही एक प्रक्रिया आहे, जी पूर्ण करावीचं लागते. (हेही वाचा - Kabir Khan backs Deepika Padukone: "आमिर-अक्षय देखील 8 तास काम करतात", वांगा-दीपिका वादात कबीर खानची दिपीकाला साथ)
कामाच्या वेळेवर जेनेलियाची प्रतिक्रिया -
View this post on Instagram
दरम्यान, दीपिका पदुकोण संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'स्पिरिट' चित्रपटात काम करणार होती. परंतु तिने आठ तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याची अट ठेवली. यासोबतच तिने 40 कोटी रुपयांची फी मागितली. असेही म्हटले जात होते की दिग्दर्शकाने तिला तेलुगू शिकण्यास सांगितले. दीपिका आणि संदीप रेड्डी यांच्यात या सर्व अटींवर सहमती होऊ शकली नाही, ज्यामुळे दीपिकाने चित्रपट सोडला. आता अभिनेत्री तृप्ती डिमरी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. पण, दीपिकाच्या चित्रपटातून बाहेर पडल्यानंतर, इंडस्ट्रीमध्ये काम आणि जीवनातील संतुलनावर चर्चा सुरू झाली आहे.