I For India Concert साठी शाहरुख खान ने गायलं गाणं; लेक अबराम म्हणतो, बस करा बाबा! (Watch Video)
यामध्ये शाहरुखचा लाडका अबराम हा त्याला बस करा बाबा, सगळंं ठीक होईल असं सांंगुन मजेशीर प्रतिक्रिया देत आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) पीडितांसाठी निधी गोळा करणे आणि घरी असलेल्या लोकांचे मनोरंजन करणे या हेतूने 3 मे रोजी I For India या ऑनलाईन Concert चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अक्षय कुमार, आमिर खान, प्रियांका चोप्रा, अमिताभ बच्चन, करण जोहर, जोया अख्तर, माधुरी दीक्षित, अनुष्का शर्मा, आलीय भट्ट यांच्यासहित अनेक बड्या कलाकारांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शाहरुख खान (Shahrukh Khan) याने सुद्धा एक गाणे गायले. या गाण्याचा एक व्हिडीओ सुद्धा शाहरुखने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. या व्हिडिओ मध्ये शाहरुखचा लाडका लेक अबराम (Abram Khan) सुद्धा दिसून येत आहे, सुरुवातीला अबराम सुद्धा नाचून, उड्या मारून बाबाची साथ देताना पाहायला मिळतो मात्र शेवटी तोच येऊन शाहरुखला आता खुप झालं बाबा असं म्हणताना दिसत आहे. अभिनेता नील नितीन मुकेश याची मुलगी नुरवी ने हनी सिंह च्या 'Loca Loca' गाण्यावर धरला ठेका, पाहा सुपर क्युट व्हिडिओ
शाहरुखचं गाणं तसं बरंच इंटरेस्टिंग आहे. “आंखें खुलीं, पर दिमाग सो जाएगा, सुन ना यार, सब सही हो जाएगा’. बाकी का वक्त पंखा देखकर बिताया, मुर्गी या अंडा, पहले क्या आया, देखो-देखो टाइम कितना बुरा चल रहा है, अब ये एसआरके सिंगर भी बन रहा है. पहले एक्टिंग से बनाया अब सिंगिंग से बनाएगा. छोड़ ना यार सब सही हो जाएगा” असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणे ऐकून शाहरुखचा लहान मुलगा अबराम म्हणाला, “बाबा आता खूप झालं, सब ठीक ही हो जायेगा असे म्हणताना दिसत आहे. या एव्हिडडिओ वर अनेकांनी कमेंट्स करत शाहरुखच्या गाण्याला बेस्ट म्हंटले आहे.
शाहरुख खान Instagram Post
दरम्यान, I For India कार्यक्रमाची सुरुवात अक्षय कुमारने तुमसे हो नहीं पाएगा हे गाणे गाउन केली होती. त्यानंतर माधुरी दीक्षित, अनिल कपूर, भूमी पेडनेकर, ए. आर. रहमान, फरहान अख्तर, आलिया भट्ट यांसारख्या अनेक कलाकारां सुद्धा कमाल परफॉर्मन्स दिला होता.