I For India Concert: बॉलिवुड अभिनेत्री आलिया भट्टने बहिण शाहीन सोबत गायलं 'दिल है की मानता नहीं' गाणं; पहा व्हिडिओ
यात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार, वरुण धवन, आलिया भट्ट यांनी सहभाग घेतला. I For India कॉन्सर्ट मध्ये बॉलिवुड कलाकारांनी घरातूनचं सहभाग नोंदवला आहे. यात काहींनी कविता वाचली तर काहींनी गाणं म्हणून कॉन्सर्टच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन केलं. बॉलिवुड अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) या कॉन्सर्टमध्ये गाणं म्हणून सहभाग घेतला आहे.
I For India Concert: बॉलिवुड कलाकारांनी कोरोना विरोधातील लढाईसाठी आणि गरीबांच्या मदतीसाठी डिजिटल इंडोर कॉन्सर्ट ची सुरुवात केली. यात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार, वरुण धवन, आलिया भट्ट यांनी सहभाग घेतला. I For India कॉन्सर्ट मध्ये बॉलिवुड कलाकारांनी घरातूनचं सहभाग नोंदवला आहे. यात काहींनी कविता वाचली तर काहींनी गाणं म्हणून कॉन्सर्टच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन केलं. बॉलिवुड अभिनेत्री आलिया भटने (Alia Bhatt) या कॉन्सर्टमध्ये गाणं म्हणून सहभाग घेतला आहे.
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात आलिया भट्ट आपली बहिणी शाहीनसोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आलियाने पूजा भट्ट च्या चित्रपटातील 'दिल है की मनाता नहीं' हे गाणं म्हटलं आहे. या व्हिडिओमधून चाहत्यांना आलियाच्या मधूर आवाजाचा अंदाज पाहायला मिळाला आहे. (हेही वाचा - अभिनेता नील नितीन मुकेश याची मुलगी नुरवी ने हनी सिंह च्या 'Loca Loca' गाण्यावर धरला ठेका, पाहा सुपर क्युट व्हिडिओ)
View this post on Instagram
Alia singing for #IForIndia ❤️ #aliabhatt
A post shared by ♡ (@bollyempire) on
I For India या कॉन्सर्टला दिग्दर्शक करण जौहरने होस्ट केलं होतं. यात चित्रपटसृष्टीतील कलाकार जाकिर हुसैन, अजय-अतुल, बादशाह, विशाल भरद्वाज, रेखा आदी कलाकारांनी आपल्या घरातून कॉन्सर्टमध्ये सहभाग नोंदवला आहे आणि लोकांना पैसे दान करण्याचं आवाहन केलं आहे. प्राप्त माहितीनुसार, या कॉन्सर्टच्या माध्यमातून आतापर्यंत 4 कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे.