Super 30 Trailer: 'सुपर 30' सिनेमाचा दमदार ट्रेलर आऊट; बिहारी सुपरहिरोच्या रुपात हृतिक रोशन याने जिंकली प्रेक्षकांची मने
हृतिक रोशन (Hrithik Roshan) याचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'सुपर 30' (Super 30) चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
हृतिक रोशन (Hrithik Roshan) याचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'सुपर 30' (Super 30) चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमात हृतिक रोशन गणितज्ञ आनंद कुमार (Anand Kumar) यांची भूमिका साकारत आहे. यात हृतिकचा काहीसा गंभीर आणि ध्येयाने झपाटलेला असा आगळावेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. (हृतिक रोशन याच्या 'सुपर 30' सिनेमाचे नवे पोस्टर आऊट)
सिनेमाचा ट्रेलर शेअर करत हृतिकने लिहिले की, "सर्व सुपरहिरो केप्स घालत नाहीत. देशाची निर्मिती करणारा हा एक विचार आहे. या विचाराला सशक्त बनवणारी ही काही माणसे आहेत. देशाच्या मातीतून आलेली अशीच एक कहाणी."
हृतिक रोशन याचे ट्विट:
आनंद कुमार सुपर 30 नावाचा शैक्षणिक प्रोग्रॅम कसा चालवतात, गरीब, मागास विद्यार्थ्यांना गणित-विज्ञानाचे शिक्षण कसे देतात, याची ही कथा आहे. या गरीब मुलांना योग्य ती दिशा दाखवून लोकांसमोर एक उदाहरण सादर करण्याचे आनंद कुमार यांचे लक्ष्य असते. सत्य घटनेवर आधारीत अशी या सिनेमाची कथा आहे.
सुपर 30 सिनेमाचा ट्रेलर:
सिनेमातील हृतिकचा दमदार लूक आणि जबरदस्त डायलॉग्स लक्ष वेधून घेतात. शिक्षणाच्या माध्यमातून श्रीमंत-गरीब ही दरी मिटवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विकास बहल यांनी केले असून 12 जुलै रोजी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.