Hrithik Roshan ने घरगुती गणपती बाप्पाचे कुटूंबियांसोबत इको फ्रेंडली पद्धतीने केले विसर्जन, Watch Inside Photos

या फोटो मध्ये ऋतिक आपले बाबा राकेश रोशनसह आपली आई, बहिण, मुले आणि Ex Wife Sussainसह अगदी साधेपणाने आपल्या घरगुती बाप्पाचे विसर्जन केले.

Hrithik Roshan Ganesh Visarjan (Photo Credits: Instagram/Viralbhayani)

यंदा कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) म्हणावा तसा गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi 2020) उत्साह दिसला नाही. त्यामुळे अनेकांनी प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करुन अगदी घरच्या घरी साधेपणाने दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन केले. यात उपक्रमात अनेक सेलिब्रिटींनी सहभाग घेतला. म्हणूनच बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशन (Hrithik Roshan) ने आपल्या कुटूंबासह त्याच्या मुंबईतील घरात विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे इको फ्रेंडली पद्धतीने विसर्जन केले. ज्यात त्याने त्याच्या कुटूंबासोबत मिळून घरात एका टपमध्ये आपल्या लाडक्या गणरायाचे विसर्जन केले. Viralbhayani ने त्याच्या घरातील विसर्जनाचे फोटो शेअर केले आहेत.

या फोटो मध्ये ऋतिक आपले बाबा राकेश रोशनसह आपली आई, बहिण, मुले आणि Ex Wife Sussain सह अगदी साधेपणाने आपल्या घरगुती बाप्पाचे विसर्जन केले. ऋतिक रोशन ने शेअर केला कॅन्सर वर मात करणा-या आपले वडिल राकेश रोशन यांचा प्रेरणादायी व्हिडिओ, Watch Video

पाहा घरातील फोटोज:

 

View this post on Instagram

 

#hrithikroshan celebrates #Ganpatifestival at home with family. His mom #pinkieroshan shared these moments. Over 31 thousand immersions happened this year as compare old to 46 thousand last year 👍

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

ऋतिक पासून घटस्फोट घेतलेली त्याची पत्नी सुझान खान ही लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आपल्या मुलांसाठी ऋतिकसोबत त्याच्या घरात राहत आहे. ऋतिकसोबत राहत असलेली रिहान आणि रिदान यांच्या सोबत राहण्यासाठी सुझाननही काही दिवस त्यांच्यासोबत ऋतिकच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला होता.

सुझानच्या या निर्णयाचे ऋतिकने कौतुक केले असून तिचे आभार मानले होते. या काळात पालक म्हणून हा तुझा हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद असल्याचे ऋतिकने सुझानला म्हटले आहे. आपण घेतलेला हा निर्णय हे माणुसकीचे एक उदाहरण बनेल असे सुझानने या पोस्टखाली प्रतिक्रिया दिली आहे.