Housefull 5 Release Date: 'हाऊसफुल 5' दिवाळीला रिलीज होणार नाही; 'या' कारणामुळे पुढे ढकलण्यात आली तारीख

आता हा चित्रपट 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करत आहेत.

Housefull 5 (PC - Facebook)

Housefull 5 Release Date: विनोदी कौटुंबिक चित्रपट 'हाऊसफुल 5' (Housefull 5) ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. साजिद नाडियादवाला (Sajid Nadiadwala) यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. साजिद नाडियाडवाला यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी सोशल मीडिया पोस्टद्वारे आगामी 'हाऊसफुल 5' चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट दिले आहे. हाऊसफुलचे चारही भाग बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. या चित्रपटांनी प्रेक्षकांच्या हृदयावर जादू केली. त्यामुळे आता प्रेक्षक पाचव्या भागाची वाट पाहत आहेत.

साजिद नाडियादवाला यांनी जारी केलं निवेदन -

साजिद नाडियादवालाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक निवेदन जारी करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. साजिदने अधिकृत निवेदनात लिहिले की, हाऊसफुल 5 च्या यशाचे श्रेय प्रेक्षकांना जाते आणि आम्ही हाऊसफुल 5 साठी देखील अशीच अपेक्षा करतो. टीमने टॉप क्लास VFX सह एक शानदार कथा तयार केली आहे. म्हणूनच आम्ही रिलीजची तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही ठरवले आहे की आम्ही एका उत्तम सिनेमॅटिक अनुभवासह पाचपट अधिक मनोरंजन देऊ शकतो. (हेही वाचा -Animal Box Office Collection: रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ने तीन दिवसांतच गाठला 200 कोटींचा टप्पा)

हाऊसफुल 5 कधी रिलीज होणार?

अक्षय कुमार स्टारर 'हाऊसफुल 5' याआधी पुढच्या वर्षी दिवाळीला रिलीज होणार होता, पण आता हा सिनेमा एका वर्षाने पुढे ढकलण्यात आला आहे. आता हा चित्रपट 6 जून 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तरुण मनसुखानी करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nadiadwala Grandson (@nadiadwalagrandson)

स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर साजिद निर्मित चित्रपटात अक्षय कुमार, जॉन अब्राहम आणि रितेश देशमुख काम करणार असल्याची चर्चा आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप अधिकृत कलाकारांची घोषणा केलेली नाही.