
हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सोशल मिडियावर बरीच सक्रिय असते. लॉकडाऊन काळत आपल्या चाहत्यांना खूश ठेवण्यासाठी आपले एकाहून एक सरस आणि हॉट फोटो शेअर करत असते. तिचे बिकीनी फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. त्यासोबतच तिचे हटके आणि ग्लॅमरस फोटोशूट देखील सोशल मिडियावर आग लावतात. मात्र नुकताने तिने आपल्या चेह-याला कसला तरी मास्क लावून बँडेज लावलेला फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिचे चाहते संभ्रमात पडले आहे. उर्वशी च्या सुंदर चेह-याला काही झाले तर नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
या फोटोनमध्ये उर्वशी झोपली असून तिच्या चेह-यावर कसले तरी मास्क ठेवले आहे. तसेच तिच्या चेह-याभोवती बँडेजसुद्धा केले आहे. हा फोटो तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
या फोटोखाली मजेशीर कॅप्शन लिहिले आहे. "माझ्या वाट्यात येणा-या लोकांना घाबरवण्यासाठी मी हा साधा मास्क लावला आहे. तसेच या दिवसात स्वत: ची, स्वत:च्या चेह-याची काळजी घेण्यासाठी हे करणे गरजेचे आहे" असेही ती म्हणाली आहे.
नुकताच उर्वशी हिने आता तिच्या इंन्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला असून तिने त्यामध्ये लॉन्जरी घातली आहे. या पोस्टमध्ये उर्वशी हिने ऑफ व्हाइट रंगातील लॉन्जरी घातलेला सेक्सी अदा असणारा फोटो पोस्ट केला आहे. उर्वशी हिच्या या ग्लॅमरस फोटोमुळे सोशल मीडियात आग लावली असून चाहते घायाळ झाले आहेत.