Himesh Reshammiya घेऊन येतोय Surroor 2021, टीजर मोशन पोस्टर प्रदर्शित
नुकताच त्याने आपल्या सोशल अकाउंटवरुन आपल्या नव्या अल्बमचा टीजर मोशन पोस्टर प्रदर्शित केला आहे.
बॉलिवूडचा लोकप्रिय संगीत दिग्दर्शक,गायक हिमेश रेशमियाने (Himesh Reshammiya) आपल्या हटके आवाजामुळे स्वत:चा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. दरम्यान हिमेशने आपल्या सोशल अकाउंटवर आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. लवकरच हिमेश आपला नवा अल्बम 'सुरूर 2021' (Surroor 2021) चाहत्यांसाठी घेऊन येत आहे.नुकताच त्याने आपल्या सोशल अकाउंटवरुन आपल्या नव्या अल्बमचा टीजर मोशन पोस्टर प्रदर्शित केला आहे.
या टीझर पोस्टरमध्ये हिमेशच्या जुन्या स्टाइलमधली आयकॉनीक कॅप आणि माइक दाखवण्यात आला असून त्याच्या जुन्या अंदाजाची झलक पहायला मिळाली. तसंच बॅकग्राऊंडला प्रेक्षकही दाखवण्यात आले आहेत. पोस्टरमध्ये त्याच्या आयकॉनीक कॅपवर ‘एचआर’ असं लिहून त्याच्या गाण्यांचा म्यूजिक लेबल ‘हिमेश रेशमिया मेलोडीज’ लॉंच करण्यात आलाय.हेदेखील वाचा- Neeti Mohan Blessed With Baby Boy: गायिका नीति मोहन हिने दिला गोंडस मुलाला जन्म, पती Nihaar Pandya ने सोशल मिडियाद्वारे दिली ही गोड बातमी
हा टीझर शेअर करताना हिमेशने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. “सुरूर 2021 चं अल्बम टीझर पोस्टर…खूप सारं प्रेम…”, असं लिहित त्याने यात रेड हार्टचे इमोजी देखील वापरले आहेत. तसंच #loveyou हा हॅशटॅग देखील त्याने या पोस्टमध्ये दिलाय. तसेच या टीजरमध्ये त्याची कॅपसुद्धा दिसत आहे.