Heeramandi Release Date: संजय लीला भन्साळी यांची महत्त्वाकांक्षी OTT मालिका 'हिरामंडी: द डायमंड बझार' 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर होणार प्रदर्शित

‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’  (Heeramandi The Diamond Bazaar) ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या वेब सीरिजचा फर्स्ट लूक काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला होता. तसेच या चित्रपटातील सकल बन हे गाणं देखील रिलीज करण्यात आलं. आता या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.  मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे आयोजित एका ड्रोन लाइट शो कार्यक्रमादरम्यान हीरामंडी वेब सीरिजची रिलीज डेट जाहीर करण्यात आली. यावेळी, 1,000 ड्रोन आकाशात उडवण्यात आले. (हेही वाचा - Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनचा पत्नी आलियासोबतचा वाद मिटला, मुलांसाठी आले एकत्र)

हीरामंडी वेब सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 1 मे रोजी रिलीज होणार आहे.  ‘हीरामंडी: द डायमंड बाजार’ या वेब सीरिजमध्ये मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, संजीदा शेख आणि शर्मीन सहगल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. वेब सीरिजच्या स्टार कास्टसह भन्साळी प्रॉडक्शनच्या सीईओ प्रेरणा सिंग आणि नेटफ्लिक्स इंडियाच्या मालिकेच्या संचालक तान्या बामी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

हम दिल दे चुके सनम,देवदास,साँवरिया,गुजारिश,गोलियों की रासलीला राम-लीला,बाजीराव मस्तानी, पद्मावत या संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. त्यांच्या पद्मावत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.