Gulabo Sitabo: अमिताभ बच्चन यांनी दिले आयुष्मान खुराना, दीपिका पादुकोण, विराट कोहली अशा 7 सेलेब्जना खास चॅलेंज; जाणून घ्या कोणी केले पूर्ण
आता 12 जून रोजी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांचा चित्रपट 'गुलाबो सीताबो' Gulabo Sitabo) ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.
लॉकडाऊनने भलेही लोकांना घरात कैद केले असेल, पण बॉलिवूड सेलेब्स सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत लोकांचे मनोरंजन करत आहेत. आता 12 जून रोजी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यांचा चित्रपट 'गुलाबो सीताबो' Gulabo Sitabo) ओटीटी प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी बिग बी सोशल मीडियावर चित्रपटाचे खास प्रकारे प्रमोशन करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असणार्या अमिताभ बच्चन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून, एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या 'गुलाबो सीताबो' चित्रपटाचा संदर्भ देत 7 सेलेब्सना टँग करत टंग ट्विस्टर चॅलेंज (Tongue-Twister Challenge) दिले आहे.
बच्चन साहेबांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहेत. या चॅलेंजद्वारे टंग ट्विस्टरला न अडकता सतत 5 वेळा बोलणे आवश्यक आहे. या आव्हानासाठी त्यांनी आयुष्मान खुराना, दीपिका पादुकोण, रणवीर कपूर, आलिया भट्ट, भूमि पेडणेकर, विराट कोहली आणि कार्तिक आर्यन यांना टॅग केले आहे. अमिताभ यांनी टंग ट्विस्टर म्हणून खालील वाक्य दिले आहे. (हेही वाचा: स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी धावले अमिताभ बच्चन; मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी बसेसनंतर बीग बींकडून 3 चार्टर्ड फ्लाईट्सची सोय)
'गुलाबो की खटर-पटर से तितर-बितर सिताबो
सिताबो के अगर-मगर से उथल-पुथल गुलाबो'.
अमिताभ यांच्या या चॅलेंजवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यांचा हा व्हिडिओ 589,524 लाईक्स मिळाल्या आहेत. हे चॅलेंज भूमी पेडणेकर व आयुष्मान खुराना यांनी पूर्णही केले आहेत. त्यांचे व्हिडिओही सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. पुढे भूमिनेही विक्की कौशल, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, शूजित सरदार अशा लोकांना हे चॅलेंज दिले आहे. आता किती लोक हे चॅलेंज पूर्ण करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.