Govinda Discharged From Mumbai Hospital: गोविंदाला मुंबईच्या रुग्णालयातून डिस्चार्ज; चाहत्यांचे मानले आभार, पाहा व्हिडिओ

तसेच पापाराझींना हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. सुनीता आहुजानंतर गोविंदाने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या आरोग्यासंदर्भात सर्वांना अपडेट दिले आहे. मीडियाशी बोलताना तो म्हणाला, 'तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद... आता मी बरा झालो आहे. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी मी हात जोडून कृतज्ञता व्यक्त करतो.

Govinda Discharged From Mumbai Hospital (Photo Credit - ANI)

Govinda Discharged From Mumbai Hospital: बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते गोविंदा (Govinda) ला या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या अपघाती गोळीबाराच्या घटनेनंतर आज, 4 ऑक्टोबर रोजी मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharged) देण्यात आला आहे. अभिनेत्याला मंगळवारी, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी चुकून त्याच्या परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने पायात गोळी लागली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गोविंदा कोलकात्याला जाण्याच्या तयारीत असताना पहाटे 4.45 च्या सुमारास ही घटना घडली.

गोविंदाची पत्नी सुनीतानेही चाहत्यांना अभिनेत्याच्या तब्येतीचे अपडेट दिले आहेत. मुंबईच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये चार दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर गोविंदाला आता डिस्चार्ज देण्यात आला आहे. गोविंदाला दुपारी एक वाजता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर गोविंदाची पहिली झलकही समोर आली आहे. तो लाल रंगाच्या कारमधून पत्नी सुनितासोबत घराकडे जाताना दिसला. त्याला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांची रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली होती. (हेही वाचा - अभिनेता गोविंदा याची प्रकृती सुधारली, चाहत्याने घराबाहेर झळकावले पोस्टर)

गोविंदाने मानले चाहत्यांचे आभार -

हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर गोविंदाने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले. तसेच पापाराझींना हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. सुनीता आहुजानंतर गोविंदाने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपल्या आरोग्यासंदर्भात सर्वांना अपडेट दिले आहे. मीडियाशी बोलताना तो म्हणाला, 'तुमच्या प्रेमाबद्दल धन्यवाद... आता मी बरा झालो आहे. तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनांसाठी मी हात जोडून कृतज्ञता व्यक्त करतो. (हेही वाचा - Govinda in Hospital: अभिनेता गोविंदाच्या पायावर तातडीची शस्त्रक्रिया करून काढली 9mm Bullet; गोळीचा फोटो वायरल (View Pic))

तत्पूर्वी, गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी सांगितलं होतं की, 'डॉक्टरांनी आम्हाला 6 आठवडे बेड रेस्ट घेण्यास सांगितले आहे, त्यामुळे संसर्गाची भीती असल्याने आम्ही कोणालाही जास्त भेटू शकणार नाही.'