Gadar Returns To Cinemas: चाहत्यांसाठी खुशखबर! 'हा' अभिनेता गदर 2 चित्रपटासाठी देणार व्हॉईजओवर (पाहा फोटो)

गदर २ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकारांची नेमकी भुमिका कोणती असणार आहे. चाहत्यांसाठी खुशखबर आहे.

Gadar 2

Gadar Returns To Cinemas:   गदर एक प्रेम कथा चित्रपटानंतर गदर 2 (Gadar 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऑगस्ट मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पुन्हा अमिषा पटेल आणि सनी देओल मुख्य भुमिकेत दिसणार आहे.  अभिनेता नाना पाटेकर यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर घेवून आला आहे. ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर या चित्रपटासाठी व्हॉईजओवर देणार असल्याचे माहिती समोर आली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात नाना पाटेकर यांचा आवाज ऐकायला येणार आहे.

गदर एक प्रेम कथा ह्या चित्रपटात सकीना आणि तारा सिंग यांची प्रेम कहाणीवर आधारलेला चित्रपट होता. अनिल शर्मा यांनी गदर 2 हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. पहिला भाग तारा सिंग आणि सकीनाच्या प्रेमकथेवर आधारित होता, ज्याने प्रेक्षकांच्या हृदयावर कायमचा प्रभाव टाकला आणि अजूनही तो कायम आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

‘उड जा काळे कावा’ हे गाणे पुन्हा रिप्राइज्ड व्हर्जन म्हणून रिलीझ करण्यात आले. या चित्रपटात ‘मैं निकला गड्डी लेके’ रिक्रिएशन देखील असेल जे लवकरच येणार असल्याचे घोषित केले आहे.  झी स्टूडिओ निर्मीत हा सिनेमा 11 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे.

अभिनेत नाना पाटेकर हे बऱ्याच दिवसांनी चित्रपट सुष्टीत काम करणार आहे. वेगवेगळ्या भुमिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट सुष्टीत त्यांचे मोठं योगदान आहे.  प्रेक्षकांना ह्या चित्रपटाची आतुरता लागली आहे. नाना पाटेकर यांच्या एन्ट्रीमुळे सर्वानांच उत्सुकता लागली आहे. गदर: एक प्रेम कथा हा चित्रपट 22 वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement