#GolmaalFIVE Announcement: अभिनेता अजय देवगण याने केली 'गोलमाल 5' चित्रपटाची घोषणा; 2020 मध्ये होणार शूटिंगला सुरुवात
हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच तो 'गोलमाल 5' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
विनोदाची मेजवानी घेऊन प्रेक्षकांना पोट धरून हसवण्यासाठी दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) घेऊन येतोय 'Golmaal Five' हा चित्रपट. गोलमाल अगेन या चित्रपटानंतर जवळपास वर्षभर रोहित शेट्टी या चित्रपटाच्या पुढच्या भागासाठी कथेवर काम करत होते. मात्र अखेर त्यांची स्क्रिप्ट लिहून पुर्ण झाली असून पुढील वर्षी म्हणजेच 2020 मध्ये ते या चित्रपटाच्या पाचव्या भागासाठी शूटिंगला सुरुवात करणार आहे. नुकतच या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अजय देवगण (Ajay Devgan) यांनी सोशल मिडियाद्वारे याची घोषणा केली आहे. तसेच प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही या संदर्भातील ट्विट केले आहे.
रोहित शेट्टी याचा 'सूर्यवंशी' हा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेचच तो 'गोलमाल 5' च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.
अजय देवगण याचे ट्विट:
हेही वाचा- Simmba Song Aankh Marey: पाहा Ranveer-Sara चे जबरदस्त डान्स मूव्ह्ज आणि गोलमाल गँगची धमाल
मागील वर्षी आलेला 'गोलमाल अगेन' हा एक हॉरर कॉमेडी होता. त्यानंतर रोहित शेट्टी त्यांच्या पुढच्या भागावर काम करत होता. आता ही कथा पूर्ण झाली लवकरच या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात होणार आहे. या चित्रपटाची घोषणा करताना सोशल मिडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये रोहित शेट्टी आणि अजय देवगण एकत्र दिसत आहे. त्यामुळे अजय देवगण या ही भागात असणार यात काही वादच नाही.
मात्र आता अजय व्यतिरिक्त या चित्रपटात अन्य कोणाकोणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. गोलमाल अगेन या चित्रपटात परिणिती चोपडा आणि तब्बू या दोन अभिनेत्री झळकल्या होत्या. त्यामुळे आता या भागातही याच दोघी दिसणार की त्याच्या आधीच्या 2 भागांतील करिना कपूर दिसणार की अन्य कोणी दिसणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.