Suhana Khan Birthday: सुहाना खान हिच्या वाढदिवसानिमित्त आई Gauri Khan तिचा ग्लॅमरस फोटो शेअर करुन दिल्या शुभेच्छा
"हॅप्पी बर्थडे, तुझ्यावर आज, उद्या आणि नेहमीच प्रेम करत राहू" असे कॅप्शन गौरी खानने या फोटोला दिले आहे
Suhana Khan Birthday: बॉलिवूडमधील रोमान्सचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) याची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) आज आपला 21 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुहानाच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते सोशल मिडियाद्वारे तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. दरम्यान सुहानाची आई गौरी खान (Gauri Khan) हिने सोशल मिडियावर सुहानाचा एक ग्लॅमरस फोटो शेअर करुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गौरी खानने शेअर केलेल्या या फोटोमध्ये सुहाना खूपच ग्लॅमरस आणि बोल्ड दिसत आहे.
सुहानाने या फोटोमध्ये ब्लॅक अँड व्हाइट रंगाचा पोलका डॉट ड्रेस घातला आहे. "हॅप्पी बर्थडे, तुझ्यावर आज, उद्या आणि नेहमीच प्रेम करत राहू" असे कॅप्शन गौरी खानने या फोटोला दिले आहे.हेदेखील वाचा- Shilpa Shetty आणि Raj Kundra ने मुलगा Viaan ला वाढदिवसानिमित्त दिले 'हे' सरप्राईज गिफ्ट, पाहून वियान झाला भावूक
आईने शेअर केलेल्या या फोटोखाली रिप्लाय करत, "आय लव यू" असे म्हटले आहे. गौरीच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटीजने कमेंट करत सुहानाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
यात सीमा खान, निलम कोठारी, भावना पांडे, नम्रता शिरोडकर आणि संजय कपूर यांसह अनेकांचा समावेश आहे. सुहाना खान सध्या फिल्म मेकिंगचे शिक्षण घेत आहे. इंग्लंडमध्ये आर्डिंगली महाविद्यालयात शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती चित्रपटांचे शिक्षण घेण्यासाठी न्यूयॉर्क यूनिवर्सिटीमध्ये गेली. 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान ते मुंबईत परतली आणि आपल्या परिवारासोबत होती.
सुहाना खान सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणे अभिनयात आपले करियर करायचे आहे. यासंदर्भात शाहरुख खानने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, "जर सुहानाला अभिनेत्री बनायचे असेल तर तिने पुढील 3-4 वर्ष अभिनय शिकला पाहिजे. माझे या इंडस्ट्रीत खूप सारे मित्र आहेत ज्यांचे असे म्हणणे आहे की माझ्या मुलांनी अभिनय करणे सुरु केले पाहिजे. मात्र मला असे वाटते की त्यांची अजून या क्षेत्रात येण्याची योग्य वेळ आलेली नाही."