व्हिडिओ : हृतिक रोशनने अशी केली बाप्पाची पूजा !
कुटुंबियांसमवेत हृतिकने गणेश चतुर्थीचा सण साजरा केला.
गणेशोत्सव सुरु झालाय आणि सगळीकडे आनंदी, उत्साही वातावरण आहे. गणेशाच्या भक्तीत अनेकजण दंग झालेत. यात सेलिब्रेटीही मागे नाहीत. सुपरस्टार हृतिक रोशनने आपल्या घरच्या गणपतीची एक झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. कुटुंबियांसमवेत हृतिकने गणेश चतुर्थीचा सण साजरा केला. या आनंदी क्षणांचा व्हिडिओ हृतिकने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओत हृतिकच्या अग्निपथ सिनेमातील गीत 'देवा श्रीगणेशा' बॅकग्रॉऊंडला वाजत आहे. यात हृतिक आपल्या मुलांसह, आई-वडील आणि बहिणीसोबत गणेशोत्सवाचा पुरेपूर आनंद घेत आहे.
यातसर्व कुटुंबिय गणपतीची बाप्पाची पूजा करून आशीर्वाद घेताना दिसत आहे. त्यानंतर रोशन कुटुंबियांच्या खास पोजने हा व्हिडिओची सांगता होते. गणपती आणण्याची रोशन कुटुंबियांच्या गेल्या ४४ वर्षांची परंपरा आहे.
हृतिक रोशन अनेकदा आपल्या चाहत्यांसाठी खास फोटोज, व्हिडिओज शेअर करत असतो. मग मुलांसोबत घालवलले क्षण असू दे किंवा मग शूटिंगचे फोटोज.