Ganeshotsav 2019: बॉलीवूडमध्ये गणेशोत्सवाची धूम, सेलिब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन (Photos)
यावर्षीही अनेक सेलेब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन झाले आहे. अनेक सेलिब्रिटी लोकांनी या उत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. चला पाहूया कोणाकोणाच्या घरी आगमन झाले आहे बाप्पांचे
आजपासून सर्वत्र गणेशोत्सवाला (Ganeshotsav 2019) सुरुवात झाली आहे. आता पुढचे दहा दिवस बाप्पा घरात विराजमान असणार आहेत. आजकाल हा सण जितक्या धुमधडाक्यात महाराष्ट्रीय साजरा करतात, जीताक्याचा जल्लोषात इतर लोकही साजरा करताना दिसून येतात. त्यात बॉलिवूडचे माहेरघर मुंबई असल्याने अनेक सेलेब्जच्याही घरी गणपती उत्सव थाटामाटात साजरा होताना दिसून येतो. यावर्षीही अनेक सेलेब्रिटींच्या घरी बाप्पांचे आगमन झाले आहे. अनेक सेलिब्रिटी लोकांनी या उत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. चला पाहूया कोणाकोणाच्या घरी आगमन झाले आहे बाप्पांचे
सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) – कर्करोगासारख्या आजारावर मात करून सोनाली बेंद्रेने पुन्हा एकदा आयुष्य नव्याने जगायला सुरुवात केली आहे. ,मागच्या वर्षी आजारपणामुळे ती इथे नव्हती त्यामुळे यावर्षी तिच्या घरी हा उत्सव जोरदार असणार आहे.
शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) – शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावर्षी अशाप्रकारे शीला शेट्टीच्या घरी गणपतीचे आगमन झाले.
विवेक ओबेरॉय (Vivek Oberoi) – अभिनेता विवेक ओबेरॉयने आपल्या घरी स्वतः गणपतीच्या मूर्तीची प्प्रराणतिष्ठापना केली आहे. हातात गणपतीची मूर्ती असलेला विवेक ओबेरॉयचा फोटो व्हायरलही होत आहे. यावर्षी विवेकने त्याच्या करीयरच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली त्यामुळे बाप्पांचा आशीर्वाद त्याच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना.
सोनू सूद (Sonu Sood) – सोनू सूदच्या घरीही मोठ्या आनंदात बाप्पांचे आगमन झाले आहे. मोठ्या भक्तिभावात आरती करून त्याने गणपतीची पाणप्रतिष्ठापना केली.
अर्पिता खान शर्मा – सलमान खानची बहिण अर्पिता शर्मां हिच्या घरीही गणपती उत्सवाला सुरुवात झाली आहे. गणपतीची पूजा करून भक्तिभावाने, गणपतीच्या नावाच्या गजराने गणपतीचे आवाहन करण्यात आले.
सनी लिओनी - सनी लिओनीच्या घरीही एक अतिशय सुंदर अशी गणेशोत्सवाची घटना पाहायला मिळाली. सनीची मुलगी निशा हिच्यासाठी सनीने एक छोटीशी बाप्पांची मुर्ती घेतलेली दिसते. छोटी निशा या चिमुकल्या बाप्पांना पाहून अतिशय आनंदित होत आहे. या व्हिडीओमध्ये सनीसोबत तिचे पतीही दिसून येत आहेत. या व्हिडीओमधून निशासाठी ते ही लहान मूर्ती घेऊन जात असल्याचे दिसून येत आहे.
बॉलीवूडमध्ये कपूर कुटुंबियांचा गणेशोत्सव प्रचंड लोकप्रिय होता. कपूर कुटुंब हे चित्रपटसृष्टीमधील सर्वात मोठे कुटुंब म्हणून ओळखले जात असल्याने त्यांच्याकडे गणपती उत्सवाची लगबग असायची. राज कपूर यांनी 70 वर्षांपूर्वी या परंपरेची सुरुवात केली होती. मात्र यावर्षी हे कुटुंब गणेशोत्सव साजरा करणार नाही. आर.के.स्टुडीओचा मालकी हक्क विकल्याने गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.