अभिनेत्री डॉली बिंद्रा हिच्याविरोधात गुन्हा दाखल

डॉली बिंद्रा ही बिग बॉस या टीव्ही शो मधील माजी स्पर्धक आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती सतत चर्चेत असते.

Dolly Bindra | (Photo Credits: file photo)

अभिनेत्री डॉली बिंद्रा (Dolly Bindra) पुन्हा एकाद चर्चेत आली आहे. तिच्यावर मुंबईतील (Mumbai) खार पोलिसांनी ( Khar Police) गुन्हा दाखल केला आहे. व्यायामशाळेतील कर्मचारी (Gym Employee) आणि तेथील लोकांना त्रास दिल्याचा डॉली बिंद्रावर आरोप आहे. डॉलीवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी साध्वी राधे माँ हिनेही डॉली बिंद्रा हिच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. दरम्यान, खार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉलीला नोटीस पाठवली जाईल व त्यानंतर तिची चौकशी करण्यात येणार आहे. डॉली बिंद्रा ही बिग बॉस या टीव्ही शो मधील माजी स्पर्धक आहे.  कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती सतत चर्चेत असते.

डॉली बिंद्रा हिच्यावरील आरोप

(हेही वाचा, Koffee with Karan 6 मधील वादग्रस्त वक्तव्यांनंतर हार्दिक पंड्या, केएल राहुल आणि करण जोहर यांच्याविरोधात जोधपूर येथे गुन्हा दाखल)

दरम्यान, डॉलीविरोधात नेमकी तक्रार कोणी दिली आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही. या आधी डॉली बिंद्रा हिच्यावर कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. ही तक्रार साध्वी राधे माँ हिने दाखल केली होती. आताही तिच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच डॉली बिंद्रा हिला नोटीस बाजावणार असल्याचे वृत्त पोलीसांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिले आहे.