Yash Raj Films वर तब्बल 100 कोटीचा फसवणुकीचा गुन्हा दाखल; कलाकारांची रॉयल्टी हडपण्याचा आरोप

भारतीय परफॉरमिंग राईट्स सोसायटीने (IPRS) दिलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने हा गुन्हा दाखल केला आहे.

आदित्य चोप्रा (संग्रहित संपादित प्रतिमा)

यशराज फिल्म्स (Yash Raj Films) कंपनी आणि त्याच्या संचालकांवर तब्बल 100 कोटी रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय परफॉरमिंग राईट्स सोसायटीने (IPRS) दिलेल्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) हा गुन्हा दाखल केला आहे. आयपीआरएस गीतकार, संगीतकार, गायक आणि संगीत निर्माता यांचे प्रतिनिधित्व करते. इंडियन परफॉर्मिंग राइट्स सोसायटीतर्फे म्युझिक रॉयल्टीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यशराज फिल्म्स कलाकारांना दूरसंचार कंपन्या, रेडिओ स्टेशन आणि म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरुन रॉयल्टी घेण्यास परवानगी देत ​​नाहीत असा आरोप आयपीआरएसने केला आहे.

सोसायटीने प्रॉडक्शन हाऊस विविध माध्यमांमधून घेत असलेल्या रॉयल्टीवरही आपला हक्क सांगितला आहे. सोसायटीने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये यशराज फिल्म्स आणि त्याचे दिग्दर्शक आदित्य चोप्रा आणि उदय चोप्रा यांची नावे आहे. या तक्रारीत सोसायटीने म्हटले आहे की, कलाकार आणि संगीत दिग्दर्शकांना रॉयल्टी घेण्याचा अधिकार आहे, मात्र हा पैसा थेट यशराज फिल्म्समध्ये जात आहे.

तक्रारीनुसार यशराज फिल्म्स कंपनी आणि त्याच्या संचालकांनी आयपीआरएस सदस्यांची म्युझिक रॉयल्टी जमा करून, जवळजवळ 100 कोटी रुपये कमावले आहेत. याच मुद्द्याबाबत पोलिसांनी कलम 409, आयपीसी कलम 34 सह कॉपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अद्याप यशराज फिल्म्सकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. या व्यतिरिक्त मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा अशा कामांमध्ये अजून कोणते प्रॉडक्शन हाऊस सामील आहे का याचा शोध घेत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif